Pimpri Corona News : कोरोनाचा हाहाकार सुरूच, आज कोरोनाचे 1 हजार 535 नवे रुग्ण

Pimpri Corona News : कोरोनाचा हाहाकार सुरूच, आज कोरोनाचे 1 हजार 535 नवे रुग्ण

Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहरातील
कोरोना रुग्ण संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. आज (रविवार) कोरोनाचे रूग्ण संख्या 1 हजार 535 झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी अधिक सतर्क राहून कोरोना व ओमायक्रोनच्या पार्श्वभूमीवर काळजी घेण्याची गरज आहे. फक्त 52 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. एकाही रुग्णांचा मृत्यू झाला नाही.

आजपर्यंत शहरातील 2 लाख 84 हजार 937 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. सध्या 5 हजार 648 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 5 हजार 240 रुग्ण गृहविलगीकरणात असून 408 सक्रीय रुग्णांवर महापालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. तर आजपर्यंत 4 हजार 526 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

आजपर्यंत 30 लाख 79 हजार 413 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *