Pimpri News: प्लॉगेथॉन मोहिमेत उचलला १२ टन कचरा
Pckhabar- पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पोलीस – आयुक्तालय यांच्या वतीने शनिवारी मुकाई चौक ते वाकड महामार्ग सेवारस्ता स्वच्छतेसाठी प्लॉगेथॉन मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत सेवारस्त्यावरील १२ टन कचरा गोळा करण्यात आला.
‘स्वच्छ भारत मिशन’च्या पिंपरी ब्रँड अॅम्बेसिडर सिनेअभिनेत्री प्राजक्ता माळी, महापालिका आयुक्त राजेश पाटील, पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, ‘ब’ प्रभाग अध्यक्ष सुरेश भोईर, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, पोलीस उपायुक्त मंचक इप्पर, , सहशहर अभियंता श्रीकांत सवणे
यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. आयुक्त राजेश पाटील म्हणाले, आपले शहर राष्ट्रीय पातळीवर स्वच्छ सर्वेक्षणात अग्रेसर होण्यासाठी महापालिका करीत असलेल्या प्रयत्नांना सर्वांनी साथ दिली पाहिजे. शहरातून जाणाऱ्या या महामार्गाची जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची असली तरी हे या शहराचे प्रवेशद्वार असल्याने तो स्वच्छ असणे आवश्यक आहे. त्यामुळे महापालिका, पोलीस प्रशासन, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण या सर्वांनी एकत्र येऊन हा रस्ता स्वच्छ करण्याचे नियोजन केले आहे.
प्लॅस्टिक बंदीस प्रोत्साहन देण्यासाठी महिला आर्थिक विकास मंडळाकडून कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. रामहरी साठे यांनी उपस्थितांना ‘माझी वसुंधरा’ ची शपथ दिली. उपायुक्त संदिप खोत, सहायक पोलीस आयुक्त नंदकिशोर भोसले-पाटील, क्षेत्रीय अधिकारी अभिजित हराळे, उमाकांत गायकवाड, उपअभियंता राजेंद्र इंगळे, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अर्चना क्षीरसागर, अशोक वरवत्तीकर, शिरीष रिंगे यांच्यासह १५० पोलीस कर्मचारी, ३२५ महापालिका कर्मचारी व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे ४५ कर्मचारी यांनी स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला.










Leave a Reply