Talegaon Dabhade News : पत्रकार दिनी बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन; पत्रकारांचा सत्कार

Talegaon Dabhade News : पत्रकार दिनी बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन; पत्रकारांचा सत्कार

Pckhabar- तळेगाव शहरात पत्रकार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विविध संस्था आणि संघटनांच्या वतीने पत्रकारांचा सत्कार करण्यात आला.

तळेगाव दाभाडे प्रेस क्लबच्या वतीने तळेगाव स्टेशन येथील शुभम काॅम्प्लेक्समध्ये झालेल्या पत्रकार दिन कार्यक्रमास नगराध्यक्षा चित्रा जगनाडे,
वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर सावंत,
वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक विशाल गजरमल, माजी नगराध्यक्ष सुरेश धोत्रे, डाॅ.मिलिंद निकम, सामजिक कार्यकर्ते दिलीप डोळस, क्लबचे अध्यक्ष गणेश बोरुडे यांच्या हस्ते आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी क्लबचे संस्थापक अध्यक्ष विलास भेगडे, ज्येष्ठ पत्रकार रमेश जाधव गुरुजी, राधाकृष्ण येणारे, गोपाल परदेशी, संतोष थिटे, जगन्नाथ काळे, राजेश बारणे, संदीप भेगडे, कैलास भेगडे, अंकुश दाभाडे आदी मान्यवर उपस्थित होते.

मधुकर सावंत म्हणाले कि,पत्रकार हे समाजाचे नाक, कान डोळे आहेत. पारतंत्र्यातही विधवा पुनर्विवाह सारखे विषय दर्पणच्या माध्यमातून प्रकर्षाने बाळशास्त्रींनी मांडले. दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत विधायक आणि निर्भीड पत्रकारीता केली. ते एक चतुष्कोनी व्यक्तीमत्व होते.पत्रकारिता कशी असावी? याचा आदर्श बाळशास्रींनी घालून दिला. पत्रकारांचे काम समाजाला प्रेरक असते.

चित्रा जगनाडे म्हणाल्या कि,लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रशासन आणि नागरिकांमधील दुवा म्हणजे पत्रकार. समाजातील चांगल्या आणि वाईट गोष्टी समाजासमोर आणण्याचे काम पत्रकार करत असतात. आजच्या पत्रकारांनी विविध भाषा अवगत असलेल्या बाळशास्त्रींचा आदर्श घ्यावा.
समाजामध्ये लोकजागृती करण्यासाठी पत्रकारांनी सदैव जागरुक राहीले पाहीजे .

विलास भेगडे यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या कार्याची माहिती दिली.
जगन्नाथ काळे यांनी प्रास्ताविक केले. विलास भेगडे यांनी स्वागत केले.कैलास भेगडे यांनी सूत्रसंचालन केले. गणेश बोरुडे यांनी आभार मानले.
दरम्यान, मेधाविन फाउंडेशनच्या वतीने फाऊंडेशनच्या अध्यक्षा वैशाली दाभाडे व त्यांच्या सर्व सदस्यांनी पत्रकारांचा सन्मान केला. भारतीय जनता पक्षाच्या कामगार आघाडीचे अध्यक्ष अशोक दाभाडे व त्यांचे सहकारी यांनीही पत्रकारांचा वृक्ष रोपे देऊन सत्कार केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *