Pimpri News : विना वापरातील सायकल क्षेत्रीय कार्यालयात देण्याचे महापालिकेचे आवाहन

Pimpri News : विना वापरातील सायकल क्षेत्रीय कार्यालयात देण्याचे महापालिकेचे आवाहन

महापालिका नादुरुस्त सायकल रिपेअर करून गरजू मुले, मुलींना मोफत भेट देणार

Pckhabar- स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेने सायकल बॅक उपक्रम हाती घेतला आहे. जुनी, विनावापर पडून असलेली सायकल महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयामध्ये भेट देण्याचे आवाहन महापालिकेने नागरिकांना केले.

महापालिका जुन्या, नादुरुस्त सायकल रिपेअर करून आर्थिकदृष्ट्या दुर्बल, गरजू मुले, मुलींना मोफत भेट देणार आहे. महापालिका सायकली जमा करणाऱ्या गृहनिर्माण सोसायट्या, नागरिकांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करणार आहे. मुले, नागरिक सायकल घेतात. दोन-तीन वर्षे वापरतात. जुनी झाल्यावर वापराअभावी घरात, परिसरात, गच्चीवर, पार्किंगमध्ये जिन्याच्या वळचणीला पडून राहतात. सायकली गंजतात. त्यामुळे सायकली भंगारवाल्याला दिल्या जातात. स्वच्छ भारत अभियानांतर्गत पिंपरी- चिंचवड महापालिकेने सायकल बँक उपक्रम हाती घेतला आहे. नागरिकांनी गृहनिर्माण सोसायटी, घरामध्ये बेवारस पडलेल्या, जुनी, विनावापर पडून असलेली सायकल आपल्या जवळच्या क्षेत्रीय कार्यालयामध्ये भेट द्यावी.

निगडी, प्राधिकरण भेळ चौक येथे ‘अ’ क्षेत्रीय कार्यालय, चिंचवड स्टेशन जवळ ‘ब’ क्षेत्रीय कार्यालय, हॉकी स्टेडियमशेजारी नेहरूनगर भोसरी येथे ‘क’ क्षेत्रीय कार्यालय, औंध- रावेत रोड रहाटणी येथे ‘ड’ क्षेत्रीय कार्यालय, पांजरपोळ संस्थेसमोर नाशिक रस्ता येथे ‘इ’ क्षेत्रीय कार्यालय, नवनगर विकास प्राधिकरण कार्यालयाची जुनी इमारत लोकमान्य टिळक चौक निगडी येथे ‘फ’ क्षेत्रीय कार्यालय, करसंकलन कार्यालय आणि शेजारील माध्यमिक विद्यालय नवीन इमारत थेरगाव येथे ‘ग’ क्षेत्रीय कार्यालय आणि कासारवाडी येथील महिला आयटीआय इमारतीत ‘ह’ क्षेत्रीय कार्यालय आहे. या ठिकाणी नागरिक जुनी, वापराविना पडून असलेली सायकल भेट देऊ शकतात. महापालिका जुन्या, नादुरुस्त सायकल रिपेअर करून आर्थिकदृष्ट्या दुर्बल, गरजू मुले, मुलींना मोफत भेट देणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *