Maval News : कविभुषण विठ्ठल दळवी यांचा कोथुर्णे भुषण पुरस्काराने सन्मान
Pckhabar- दारूंब्रे शाळेचे विठ्ठल दळवी यांचा कोथुर्णे भूषण पुरस्काराने सन्मान ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला.
दळवी यांनी आपल्या लिखाणातून संतांचे विचार लोकांपर्यंत पोहचविण्याचे कार्य केले आहे. तसेच कवितामधून पर्यावरण संरक्षण, कोरोणाचा पृथ्वीवर शिरकाव , छत्रपती शिवरायांची महती शूर वीरांचे कार्य, देशाभिमान याविषयी त्यांनी आपल्या कवितांमधून विचार लोकांसमोर मांडले. त्यांच्या या कार्यामुळे यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यामुळे कोथुर्णे हि जन्मभूमी असलेल्या गावाचे नावलौकिकात भर पडली आहे. या सर्वांचा विचार करून ग्रामस्थांच्या वतीने त्यांना कोथुर्णे भूषण ह सन्मान देण्यात आला.
दळवी यांना मिळालेल्या पुरस्कारांबददल कार्याध्यक्ष पुणे जिल्हा भारतीय जनता पक्षाचे बाळासाहेब घोटकुले, माजी सभापती ज्ञानेश्वर दळवी, शिवाजी महाराज ढोले, हभप वाघुजी महाराज दळवी, उपसरपंच भाऊ बाबुराव दळवी, चेअरमन विविध कार्यकारी सोसायटी सिदु दळवी, विठ्ठल रावजी दळवी, वाघुजी दळवी, किसन दळवी, पांडूरंग दळवी, हिरामण नढे, बंडु ठाकर, नथू फाटक, नंदू दळवी, किसन गावडे अदिंनी अभिनंदन केले.










Leave a Reply