Pimpri News : मोकळ्या भूखंडावर कचरा टाकल्यास दंडात्मक कारवाई
Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहरातील कोणत्याही मोकळ्या भूखंडावर कचरा टाकणाऱ्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. छोट्या स्वरूपात कचरा टाकणाऱ्या व्यक्ती, आस्थापनेविरुद्ध ५ हजार, तर मोठ्या प्रमाणात कचरा टाकल्यास ५ ते २५ हजार रुपयांपर्यंत दंड आकारण्यात येणार आहे.
महापालिकेमार्फत शहरामध्ये स्वच्छता राखण्याकरिता विविध उपाययोजना करण्यात येते. तसेच अस्वच्छता पसरविणाऱ्या व्यक्ती, आस्थापनांविरुद्ध दंडात्मक कारवाईदेखील करण्यात येत आहे; परंतु शहरामध्ये विविध भागांमध्ये मोकळे प्लॉट्स असून, त्याठिकाणी कचरा टाकण्यात येत असल्याचे वारंवार निदर्शनास आले आहे. त्यामुळे अशा मोकळ्या प्लॉट्समध्ये कचरा टाकणाऱ्या व्यक्ती, आस्थापनांविरुद्धदेखील दंडात्मक कारवाई करणे आवश्यक आहे.
शहरातील सर्व मोकळ्या प्लॉट्स, भूखंडांमध्ये असलेली अस्वच्छता सर्व भूखंडधारकांनी तातडीने स्वच्छ करून घेण्याची कार्यवाही करावी. यापुढे कोणत्याही मोकळ्या प्लॉट्स, भूखंडामध्ये कचरा टाकताना व्यक्ती आढळून आल्यास त्या व्यक्तीविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात येईल. छोट्या स्वरूपात कचरा टाकणाऱ्या व्यक्ती, आस्थापनेविरुद्ध ५ हजार, तर कचरा टाकल्यास ५ ते २५ हजार रुपयांपर्यंत दंड आकारण्यात येणार आहे. त्याचबरोबर मोकळ्या भूखंडामध्ये अस्वच्छता होऊ नये, याची सर्वस्वी जबाबदारी ही त्या जागेच्या मालकाची असल्याने मोकळा प्लॉट अस्वच्छ झाल्याचे दिसून आल्यास संबंधित मालकावरसुद्धा दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा आयुक्त राजेश पाटील यांनी दिला आहे.










Leave a Reply