राज्यात राष्ट्रवादी राबविणार ‘मिशन घरवापसी’ !

राज्यात राष्ट्रवादी राबविणार ‘मिशन घरवापसी’ !

Pckhabar- भाजपमध्ये गेलेल्या आमदारांना पुन्हा पक्षात घेत राष्ट्रवादीकडून राज्यात ‘मिशन घरवापसी’ राबवण्यात येणार असल्याच्या चर्चेने राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. गयारामांना पुन्हा पक्षात घेण्याची जबाबदारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाचे नेते अजित पवार आणि जयंत पाटील यांच्याकडे सोपवल्याचंही बोललं जात आहे.

‘भाजपमध्ये जे आमदार गेले त्यांना तिथं किंमत नाही. त्यामुळे ते पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये येऊ पाहत आहेत. हे आमदार शरद पवार आणि अजित पवार यांच्यासोबत संपर्कात आहेत, असे आमदार स्थानिक राजकारणाचा विचार करून पक्ष प्रवेश करत आहेत,’ असा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *