Pimpri News : पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलातील ४०३ पोलीस कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’

Pimpri News : पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलातील ४०३ पोलीस कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’

Pckhabar-  कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाच्या धोरणानुसार ५५ वर्षांपुढील शहरातील पोलिसांना ‘वर्क फ्रॉम होम’ देण्यात येणार आहे. त्यामुळे पिंपरी – चिंचवड शहर पोलीस दलातील ४८ अधिकारी आणि ३५५ कर्मचारी अशा एकूण ४०३ पोलीस कर्मचाऱ्यांना घरूनच काम करावे लागणार आहे. त्यामुळे पोलिसांना दिलासा मिळाला आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. त्यात रोज नव्या रुग्णांची भर पडत
आहे. पोलिसांना त्यांचे कर्तव्य बजावत असताना त्यांचा नागरिकांशी थेट संपर्क येतो. यामुळे पोलीस कर्मचारी कोरोना बाधित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यात ५५ वर्षांपुढील अनेक पोलीस कर्मचाऱ्यांना इतर शारीरिक आजार असण्याची शक्यता असते. उच्च रक्तदाब, मधुमेह आदी आजार असलेल्यांना संसर्गाचा धोका अधिक प्रमाणात होण्याची शक्यता असते. त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत त्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ काम देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. वर्क फ्रॉम होम असलेल्यांना  विविध गुन्ह्यांच्या तपासाची कागदपत्रे, अहवाल पूर्तता, आढावा आदी जबाबदारी त्यांच्याकडे सोपविण्यात येणार आहे.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडे सध्या अधिकारी आणि कर्मचारी मिळून एकूण ३ हजार २७५ पोलीस कर्मचारी आहेत. त्यात ४०३ पोलीस ५५ वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत. ५५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या ३५५ कर्मचाऱ्यांमध्ये ३०५ सहायक फौजदार (सहायक पोलीस उपनिरीक्षक), तर ५० हवालदार आहेत, तर ४८ अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *