Pimpri Corona News : धोका वाढतोय, आज कोरोनाचे 1 हजार रुग्ण

Pimpri Corona News : धोका वाढतोय, आज कोरोनाचे 1 हजार रुग्ण

Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहरातील
कोरोना रुग्ण संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. आज (शुक्रवार) कोरोनाचे रूग्ण संख्या 1 हजार झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी अधिक सतर्क राहून कोरोना व ओमायक्रोनच्या पार्श्वभूमीवर काळजी घेण्याची गरज आहे. फक्त 27 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. एकाही रुग्णांचा मृत्यू झाला नाही.

आजपर्यंत शहरातील 2 लाख 82 हजार 329 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. सध्या 3 हजार 135 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 2 हजार 809 रुग्ण गृहविलगीकरणात असून 326 सक्रीय रुग्णांवर महापालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. आजपर्यंत 30 लाख 40 हजार 822 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *