Pimpri News: नवमहाराष्ट्र विद्यालयात विभागीय अधिकारी किसन रत्नपारखी यांची भेट
Pckhabar-कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर इ. १ ली ते ८ वी चे वर्ग बंद करण्यात आले आहेत. ९ वी ते१२ वी चे वर्ग सुरू आहेत. या मुलांची सुरक्षेच्या दृष्टीने सर्व काळजी घेतली जावी तसेच लिखाणात व परीक्षेला आत्मविश्वासाने त्यांना सामोरे जाता यावे, त्यांचे लसीकरण करून ते शिक्षणाच्या प्रवाहात रहावेत यासाठी रयत शिक्षण संस्थेच्या पश्चिम विभागाचे विभागीय अधिकारी किसन रत्नपारखी यांनी नवमहाराष्ट्र विद्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी प्रत्यक्ष विद्यार्थ्यांशी संवाद साधला, तसेच शिक्षकांशी संवाद साधत दैनदिन कामकाजाचा आढावा घेतला.
यावेळी विद्यालयाचे प्राचार्य उत्तम पाटील , उपमुख्याध्यापक पी. एम. शेख, पर्यवेक्षक शरद परदेशी पर्यवेक्षिका शुंभागी गमे यांनी त्यांना दैनदिन शालेय कामकाजाची माहिती दिली व त्यांचे आभार मानले.










Leave a Reply