Maval News : पंचक्रोशी विद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा, शिक्षकांचा सत्कार

शिवरायांचा पुतळा भेट देऊन मुख्याध्यापक श्री नारायण दादू पवार यांचा माजी विद्यार्थ्यांतर्फे सत्कार

Pckhabar- मावळ तालुक्यातील दारुंब्रे या छोट्याशा गावामध्ये पंचक्रोशी हायस्कूल दारुंब्रे हे विद्यालय सन 1991 आणि 1992 पासून अविरत शिक्षण या पवित्र क्षेत्रात आपले ज्ञानदानाचे उल्लेखनिय व पवित्र कार्य करत आहे. यानिमित्ताने माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्याचे आणि शिक्षकांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.
शिरूर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती विश्वासराव ढमढेरे, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष संदीप ढमढेरे यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
हिंदवी स्वराज्य रक्षक छत्रपती शिवरायांचा पुतळा भेट देऊन विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री नारायण दादू पवार यांचा माजी विद्यार्थ्यांनी सत्कार केला. विद्यालयाचे लाडके माजी विद्यार्थी हिरामण सोरटे, मा उपसरपंच ग्रामपंचायत दारुंब्रे सदस्य शरद भालेकर, रामदास ठाकर, रमेश लोहोकरे, संजय मोकाशी मा, ग्रामपंचायत सदस्य सांगवडे , विलास ढमाले ग्रामपंचायत सदस्य दारुंब्रे कचरु सोरटे, नयना भेगडे ,जयश्री वाघोले, अरुणा भोते, अनिता जाधव , मनिषा वाघोले विद्या गायकवाड, विदयार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.
विशेषतः ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणाची सोय व्हावी अशा हेतूने वाळवा शिक्षण संस्था इस्लामपूर ता. वाळवा. जि. सांगली या सेवाभावी संस्थेने स्थापन करण्यात आलेले हे विद्यालय संस्थेचे मानद, सचिव मा. श्री. बी. एस पाटील यांच्या सहकार्यातून व अथक परिश्रमातून सेवाभावी वृत्तीने सुरू केलेले हे विधालयाचे स्वप्न अखेर साकार झाले. या विद्यालयातील शिक्षकांनीही हिरिरीने काम करुन दहा वर्षे विनाअनुदान तत्त्वावर जे ज्ञान दानाचे पवित्र उल्लेखनीय कार्य केले. अशा या योगदानाचा विचार करता सर्व विद्यार्थ्यांनी एक पवित्र विचार डोळयायासमोर ठेऊन विदयार्थी हा केंद्रबिंदू मानून, विद्यार्थ्यांचे दुःख जाणून शिक्षकांनी हे प्रभावी कार्य अखंडपणे सुरू ठेवले अशा या शिक्षकांचा सन्मान करत महाराष्ट्राची परंपरा व अस्मिता जपण्याचे जे कार्य केले खरोखरच प्रशंसनीय आहे , अशा सर्व गुरुंना मानाचा मुजरा, ज्यां च्या विचारांनं सुजलाम सुफलाम झाला मावळ परिसर सारा, शिक्षकांनी आपला बहुमूल्य वेळ देऊन विद्यालयाने असे अनेक विद्यार्थी घडविले अशा शिक्षकांचा विद्यार्थ्यांनी केलेला यथोचित असा सन्मान खरोखरच प्रशंसनीय आहे. मोठ्या उत्साहाने कार्यक्रमाचे नियोजन करून सर्वांचा मानसन्मान करून सर्व शिक्षकांचे व विद्यार्थ्यांची भाषणे झाली विद्यार्थ्यांनी आभार मानले. विद्यालयाचा असाच नावलौकिक वाढावा प्रत्येकानं यासाठी खारीचा वाटा उचलावा विचारातून देश घडावा अशा सुंदर संकल्पनेतून कार्यक्रमाची सांगता झाली.










Leave a Reply