Pimpri News : काँग्रेसप्रणित पंजाब सरकारचा पिंपरी-चिंचवड भाजपाकडून निषेध

Pimpri News : काँग्रेसप्रणित पंजाब सरकारचा पिंपरी-चिंचवड भाजपाकडून निषेध
– पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यातील सुरक्षेबाबत बेफिकीरी

Pckhabar-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत मोठी त्रूट राहिल्याने पंजाबमधील रॅली रद्द करण्यात आली. तेथील आंदोलकांनी ताफा अडवल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी १५ ते २० मिनिटे उड्डाणपूलावरच अडकले होते. मोदींच्या दौऱ्याची कल्पना असताना आणि सुरक्षेचे आश्वासन दिलेले असतानाही इतकी मोठी घोडचूक काँग्रेसप्रणित पंजाब सरकारने केला, अशी संताप पिंपरी-चिंचवड भाजपा पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पंजाबमधील फिरोजपूर येथे प्रचारसभा होणार होती. सकाळी पंतप्रधान मोदी भटिंडा येथे पोहोचले, तेथून ते हुसैनीवाला येथील राष्ट्रीय शहीद स्मारकाकडे हेलिकॉप्टरने जाणार होते. परंतु पाऊस आणि खराब दृश्यमानतेमुळे पंतप्रधानांनी हवामान स्वच्छ होण्याची सुमारे २० मिनिटे वाट पाहिली. मात्र, हवामानात सुधारणा न झाल्याने त्यांनी रस्त्याने राष्ट्रीय शहीद स्मारकाला भेट देण्याचे ठरले. हा रस्त्याचा प्रवास तब्बल २ तासांचा होता.
डीजीपी पंजाब पोलिसांकडून आवश्यक सुरक्षा व्यवस्थेची पुष्टी करण्यात आली होती. यानंतर पंतप्रधान रस्त्याने प्रवास करण्यासाठी निघाले. हुसैनीवाला येथील राष्ट्रीय शहीद स्मारकापासून सुमारे ३० किमी अंतरावर पंतप्रधानांचा ताफा फ्लायओव्हरवर पोहोचला तेव्हा काही आंदोलकांनी रस्ता अडवल्याचे दिसून आले. त्यात पंतप्रधान मोदींना १५-२० मिनिटे फ्लायओव्हरवर अडकून राहावे लागल्याचे सांगण्यात आले. पंतप्रधानांच्या सुरक्षेतील ही मोठी त्रुटी होती.

दरम्यान, पंतप्रधानांचे वेळापत्रक आणि प्रवासाची योजना पंजाब सरकारला आधीच कळवण्यात आली होती. प्रक्रियेनुसार, त्यांची सुरक्षा तसेच आकस्मिक योजना तयार ठेवण्यासाठी आवश्यक व्यवस्था पंजाब सरकारला करावी लागणार होती. त्यामुळे पंजाब सरकारला रस्त्याने पंतप्रधानांचा दौरा सुरक्षित करण्यासाठी आणि वाहतूक रोखण्यासाठी अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था करायला हवी होती. मात्र, तसेच घडले नाही, असा संताप भाजपा मुख्य प्रवक्ते अमोल थोरात यांनी व्यक्त केला.

काँग्रेस नफरत की राजनिती ना करें : आमदार महेश लांडगे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत काँग्रेसप्रणित पंजाब सरकारने ढिसाळपणा केला. त्यामुळे पंतप्रधान यांना १५ ते २० मिनिटे उड्डाणपुलावर थांबावे लागले. भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या वीर भारतीयांना अभिवादन करण्यासाठी पंतप्रधान हुसैनवाला येथील राष्ट्रीय शहीद स्मारकाकडे जात होते. देशाच्या पंतप्रधानांबाबत प्रत्येक राज्यातील सरकारला आदर असला पाहिजे. विशेष म्हणजे, ‘‘प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी का काफिला रोक दिया जाता है..प्रदर्शनकारी रस्ते पर अड़ जाते है। पीएम की जान को ख़तरा पैदा होता है। और पंजाब सरकार पंजाब पुलिस देखती रहती है। पता है… 2014 से कॉंग्रेस के हात में सिर्फ निराशा आई है इसका गुस्सा ऐसे ना निकालें। नफरत की राजनीति ना करें..!’’ अशा शब्दांत आमदार महेश लांडगे यांनी सोशल मीडियावर पंजाब सरकारचा निषेध केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *