Pimpri News : इन्स्पायर ॲवार्ड मध्ये नवमहाराष्ट्र विद्यालयाचे यश
Pckhabar- राष्ट्रीय पातळीवर विज्ञान आणि तंत्रज्ञान यामध्ये दिल्या जाणाऱ्या सर्जनशील उपक्रमामध्ये नवमहाराष्ट्र विद्यालय पिंपरी या विद्यालयाने घवघवीत यश संपादन केले आहे. सातवी मध्ये शिकणारा विद्यार्थी अनुकूल अनंत चंदनशिवे आणि इयत्ता 9 मध्ये असणारा विद्यार्थी रोहन दत्ता मोरे यांनी तयार केलेल्या वैज्ञानिक उपकरणाची इंस्पायर अवार्ड 2021 साठी निवड झालेली आहे,या विद्यार्थ्यास रुपये दहा हजार त्याच्या उपकरण निर्मितीसाठी मिळणार आहेत.
विभाग प्रमुख भारती देवडकर व सहाय्यक के. डी. मुरूमकर यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले. तसेच science Olympiad foundation (SOF) मध्ये विद्यालयातील इ.१० वी चा विद्यार्थी शिवाजी विजय बधाले यांने सुर्वण पदक मिळविले त्याला उपशिक्षिका कल्पना जगताप यांनी मार्गदर्शन केले. तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक उत्तम पाटील उपमुख्याध्यापक पी.एम. शेख ,पर्यवेक्षक शरद परदेशी पर्यवेक्षिका शुंभागी गमे व सर्व शिक्षक वृंद यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.










Leave a Reply