Talegaon Dabhade Crime News : पायी जाणाऱ्या महिलेची 70 हजार रुपयांची सोन्याची चैन हिसकावली

Talegaon Dabhade Crime News : पायी जाणाऱ्या महिलेची 70 हजार रुपयांची सोन्याची चैन हिसकावली
Pckhabar- मुलीला ट्यूशनवरून पायी घरी घेऊन जात असताना महिलेच्या गळ्यातील 70 हजार रुपयांची सोन्याची चैन एकाने जबरदस्तीने हिसकावून पोबारा केला. ही घटना 4 जानेवारी रोजी सायंकाळी सात वाजता दाभाडे एमराॅल्ड पासून मोहननगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर घडली.

याप्रकरणी 38 वर्षीय महिलेने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या त्यांच्या मुलीला ट्यूशनवरून घरी घेऊन जात होत्या. सायंकाळी सात वाजता दाभाडे एमराॅल्डपासून मोहननगरकडे जात असताना पाठीमागून चालत आलेल्या एकाने त्यांच्या गळ्यातील 70 हजार रुपयांची सोन्याची चैन हिसकावून अंधाराचा फायदा घेऊन झाडीत पळ काढला.

फौजदार भोसले अधिक तपास करत आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *