Pimpri News : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन      

Pimpri News : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

Pckhabar-रयत शिक्षण संस्थेच्या, नवमहाराष्ट्र विद्यालय व ज्यु. कॉलेजमध्ये सावित्रीबाई फुले जंयती निमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य उत्तम पाटील, उपमुख्याध्यापक पी. एम. शेख, पर्यवेक्षक शरद परदेशी, पर्यवेक्षिका शुंभागी गमे, तसेच सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.

यावेळी आयोजन करण्यात आलेल्या online कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य उत्तम पाटील यांनी केले. प्रमुख पाहुण्याचा परिचय वंदना कुलकर्णी- अग्रवाल यांनी केले, प्रमुख पाहुणे राजेश टेकरीवाल यांनी शिक्षकांना प्रेरणादायी ठरेल असे अतिशय सुंदर दाखले देत अप्रतिम व्याख्यान दिले. कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख निता शेटे यांनी केले. उपस्थिताचे आभार उपमुख्याध्यापक पी.एम. शेख यांनी मानले.
सावित्रीच्या विचाराचा वसा आणि वारसा पुढे चालवणाऱ्या सर्व सावित्रीच्या लेकीना भविष्यातील संधी उपलब्ध होवोत यासाठी शुभेच्छा पर्यवेक्षिका शुंभागी गमे यांनी दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *