Pimpri Corona News : नागरिकांनो गाफीलपणा टाळा; आज साडेतीनशे कोरोना रुग्ण

Pimpri Corona News : नागरिकांनो गाफीलपणा टाळा; आज साडेतीनशे कोरोना रुग्ण

मास्क, सॅनिटाइजरचा वापर करण्याचे आवाहन

Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहरातील
कोरोना रुग्ण संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. आज ( मंगळवार) कोरोनाचे रूग्ण संख्या 350 झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी अधिक सतर्क राहून कोरोना व ओमायक्रोनच्या पार्श्वभूमीवर काळजी घेण्याची गरज आहे. फक्त 29 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. मात्र, एकाही रुग्णांचा मृत्यू झाला नाही, हि दिलासादायक बाब आहे.

आजपर्यंत शहरातील 2 लाख 79 हजार 922 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. सध्यासध्या 805 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 572 रुग्ण गृहविलगीकरणात असून 233 सक्रीय रुग्णांवर महापालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. आजपर्यंतआजपर्यंत 30 लाख 1 हजार 447 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *