Pimpri News: विज्ञान-गणित उपकरणे व खेळणी प्रदर्शन नवमहाराष्ट्र विद्यालयात उत्साहात संपन्न

Pimpri News: विज्ञान-गणित उपकरणे व खेळणी प्रदर्शन नवमहाराष्ट्र विद्यालयात उत्साहात संपन्न
Pckhabar- सरत्या वर्षाला निरोप अन् नवीन वर्षाच्या स्वागतालाच विद्यार्थ्यांनी त्यांच्यातील आत्मविश्वास विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून सर्वांसमोर ठेवला. निमित्त  होते fevicreate आयोजित सर्जनशील पर्यावरणपूरक वैज्ञानिक प्रकल्पाचे, या उपक्रमामध्ये विद्यालयातील 110 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

प्रदर्शनाचे उद्घाटन विद्यालयाचे प्राचार्य उत्तम पाटील व उपमुख्याध्यापक पी. एम. शेख यांच्या हस्ते झाले.

याप्रसंगी विद्यालयाचे पर्यवेक्षक शरद परदेशी व पर्यवेक्षिका शुंभागी गमे, विज्ञान शिक्षक के.डी. मुरुमकर , भारती देवडकर व निर्मला ठोंगीरे उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी यावेळी पवनचक्की, सोलर एनर्जी, तसेच हवेचा दाब, टाकाऊतून टिकाऊ व पुरसूचक यंत्र, प्रोजेक्टर इतर अनेक प्रकारची उपकरणे तयार केली कमीतकमी खर्चामध्ये सुबक साधने विद्यार्थ्यांनी तयार केली होती.

उपकरणाचे परीक्षण के.डी. मुरूमकर यांनी केले होते. प्रथम क्रमांक आर्यन गोपाळ गायकवाड द्वितीय क्रमांक वेंदात जाधव व  तृतीय क्रमांक विनायक तारु तारु यांनी मिळविला , उत्तेजनार्थ क्रमांक नरेंद्र राऊत, वेंदात ओवूलकर, श्रेयस कंरजेकर व शौर्य कदम यांनी मिळविला.

कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन निता शेटे यांनी केले. प्रदर्शन पाहण्यासाठी विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना खुले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑफलाईन घेतलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये
आत्मविश्वास व उत्साह वाढला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *