Pimpri News: पोस्टकार्डच्या माध्यमातून कोरोना संदर्भात जनजागृती
नवमहाराष्ट्र विद्यालयात पत्रलेखन उपक्रम
Pckhabar- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरू होण्याची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांनी ऑफलाईन शाळा सुरू होताच शाळा परत बंद पडू नयेत. व कोरोनाला प्रतिबंध व्हावा यासाठी पोस्टकार्डच्या माध्यमातून जनजागृती केली.
इ. ८ वी च्या वर्गातील विद्यार्थ्यांनी हा उपक्रम राबविला. पत्रलेखनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ऑनलाईनच्या काळामध्ये पोस्टाचे महत्त्व कळावे, तसेच पत्रलेखनाचे प्रकार अवगत व्हावेत , स्वतः टपाल खात्याची माहिती व्हावी, तसेच पोस्टाचे शताब्दी वर्ष सुरु आहे. या सर्वांची सांगड घालत उपशिक्षिका निता शेटे यांनी हा उपक्रम राबविला.
यावेळी विद्यार्थ्यानी मास्कचा वापर करण्याचा आग्रह करत कोरोनाला प्रतिबंध करण्याविषयी सुचविले आहे. ही सर्व पत्र शहरातील प्रसिद्ध दैनिकाच्या नावाने विद्यार्थ्यांनी पोस्ट केली आहेत.
या उपक्रमासाठी प्राचार्य उत्तम पाटील उपमुख्याध्यापक पी. एम. शेख पर्यवेक्षक शरद परदेशी व पर्यवेक्षिका शुंभागी गमे यांनी मोलाचे सहकार्य केले.










Leave a Reply