Chinchwad News: … तेव्हाच भारत जगावर राज्य करेल : डॉ. अपर्णा बागले

Chinchwad News: तेव्हाच भारत जगावर राज्य करेल : डॉ. अपर्णा बागले

Pckhabar- चिंचवड स्टेशन येथील विकास शिक्षण मंडळाची सी के गोयल विद्यालयात “सावित्रीबाई फुले, व राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्त “जिजाऊ ते सावित्री सन्मान लेकीचा “अभियानाअंतर्गत कार्यक्रम घेण्यात आला. सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन संस्थेचे अध्यक्ष श्री जगदिश जाधव डॉ. अपर्णा बागले, व विजय जाधव प्राथमिक उपमुख्याध्यापक बाळू महाजन यांच्या हस्ते करण्यात आले.

“मी सावित्री बोलते “(मनीषा चिखले) “मी जिजाऊ बोलते “(ज्योती जॉन) डॉ. आनंदीबाई जोशी( स्नेहल परदेशी) या शिक्षकांनी तसेच विद्यार्थ्यांनी देखील सावित्रीबाई फुले राजमाता जिजाऊ वेशभूषा परिधान करून एक पात्री प्रयोग ,कवितेतून व भाषणातून उजाळा दिला.

डॉक्टर अपर्णा बागले म्हणाले की, “लोकांच्या अंगात देवी भूतच का येतात? शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले, व राजमाता जिजाऊ यांच्या सारखी विचारवंत का येत नाहीत ?जेव्हा विचारवंत अंगात येतील तेव्हा भारत जगावर राज्य करेल.”

याप्रसंगी माध्यमिक मुख्याध्यापक बाळाराम पाटील, पर्यवेक्षक दत्तात्रय भालेराव ,शरद पटेल आदी
पाहुणे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन पुष्पा शिंदे, निता खैरे , वर्षा भिटे , सारिका आदमाने , दिलशाद मुलानी, भाऊसाहेब पगार, अनिल मुटकुळे, व देवरे अशोक यांनी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुष्पा शिंदे यांनी तर आभार मनीषा चिखले यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *