Pimpri News : शहरात उद्यापासून 15 ते 18 वयोगटातील मुलांसाठी कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण

Pimpri News : शहरात उद्यापासून 15 ते 18 वयोगटातील मुलांसाठी कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण

8 केंद्रांवर होणार लसीकरण; प्रत्येक लसीकरण केंद्रावर 500 डोस

Pckhabar- केंद्र सरकारने जाहीर केल्यानुसार उद्या (सोमवार) पासून देशात 15 ते 18 वयोगटातील मुलांसाठी लसीकरण सुरू करण्यात येणार आहे.  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीनेही शहरातील विविध भागातील आठ केंद्रावर मुलांंना कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाची सोय केली आहे. 15  ते 18 या वयोगटातील मुलांना को-वॅक्सीन ही लस दिली जाणार आहे.

15 ते 18 वयोगटामधील (जन्माचे वर्ष सन २००७ व त्यापुर्वीचे) मुलांचे कोविड-१९ लसीकरण सुरु करण्यात येणार आहे. यासाठी 1 जानेवारी 2022 पासून कोविन पोर्टलवर नोंदणी सुविधा उपलब्ध होणार आहे.

लाभार्थी स्वत: नोंदणी करू शकतात किंवा नोंदणीकरीता यापुर्वी कोविन पोर्टलवर असलेल्या खात्याद्वारे ऑनलाईन पध्दतीने किंवा युनिक मोबाईल नंबरद्वारे नवीन खाते तयार करून देखील नोंदणी करू शकतात. ही सुविधा सध्या सर्व पात्र लाभार्थ्यांसाठी उपलब्ध आहे.  लसीकरणासाठी ऑनलाईन पध्दतीने पुर्वनियोजित वेळ (Appointment/Slot Booking) घेणे करीताची सुविधा www.cowin.gov.in  या कोविन पोर्टलवर दि. 3 जानेवारी, 2022 रोजी सकाळी 8 वाजता खालील नमुद लसीकरण केंद्रामध्ये  उपलब्ध असणार आहे.

येथे होणार लसीकरण

आकुर्डी रुग्णालय, इ.एस.आय.एस हॉस्पीटल- मोहननगर, चिंचवड
500 डोस

तालेरा रुग्णालय
प्रेमलोक पार्क दवाखाना
500 डोस

वायसीएम रुग्णालय
मासुळकर कॉलनी आय हॉस्पिटल, मासुळकर कॉलनी, अजमेरा
500 डोस

थेरगाव रुग्णालय

नवीन थेरगांव रुग्णालय, थेरगाव
500 डोस

भोसरी रुग्णालय

जुने भोसरी रुग्णालय (पुना पब्लिक स्कुल), भोसरी
500 डोस

यमुनानगर रुग्णालय
काळभोर गोठा उर्दू शाळा, यमुनानगर रुग्णालया शेजारी, यमुनानगर
500 डोस

जिजामाता रुग्णालय

नविन जिजामाता रुग्णालय
500 डोस

सांगवी रुग्णालय
कासारवाडी दवाखाना, कासारवाडी
500 डोस

या लसीकरणाचा 15 ते 18 वयोगटातील मुलांनी लाभ घ्यावा असे आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकिय विभागाचे  सहा. आरोग्य वैद्यकिय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *