Pimpri News: ‘पीएमपीएल’कडून विद्यार्थ्यांना अनुदानित पासचे वितरण सुरू

Pimpri News: ‘पीएमपीएल’कडून विद्यार्थ्यांना अनुदानित पासचे वितरण सुरू
Pckhabar-पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून महापालिकेच्या हद्दीतील प्राथमिक, माध्यमिक आणि खासगी शाळांतील पाचवी ते दहावी 2021-2022च्या विद्यार्थ्यांसाठी अनुदानित पासचे वितरण सुरू करण्यात आले आहे.

‘पीएमपीएमएल’कडून शैक्षणिक वर्षासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका शाळांतील प्राथमिक, माध्यमिक आणि पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना व महापालिका हद्दीतील मान्यताप्राप्त खासगी शाळांतील विद्यार्थ्यांसाठी बस पास वितरणाची योजना सुरू केली आहे. भरून दिलेल्या अर्जाची स्वीकृती महामंडळाच्या सर्व बस आगारांमध्ये करण्यात येईल. महामंडळाच्या सर्व पास केंद्रांवरूनसुद्धा फक्त अर्जाचे वाटप करण्यात येणार आहे.

महामंडळाच्या सर्व आगारांमध्ये शैक्षणिक संस्था आणि त्यांचे प्रतिनिधी यांनी शालेय विद्यार्थ्यांचे एकत्रित अर्ज आणल्यास त्या शैक्षणिक संस्थेस एकत्रित पास दिले जातील. ते शाळाप्रमुखांनी त्यांच्या शाळेत वितरित करावेत. यामुळे सर्व विद्यार्थ्यांना पास केंद्रावर येण्याची गरज भासणार नाही. खासगी शाळांतील विद्यार्थ्यांची
कागदपत्रांची तपासणी झाल्यावर पासची 25 टक्के रक्कम चलनाअन्वये महापालिकाहद्दीतील विद्यार्थ्यांसाठी बँक ऑफ बडोदाच्या कोणत्याही शाखेमध्ये भरणा करता येईल. अर्ज, चलन आणि कागदपत्रे जवळच्या आगारात सादर केल्यावर पास मिळू शकेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *