Chinchwad News : सांगवीतील मजूर अड्ड्यावर पथनाटयातून ओमायक्राँनवर जनजागृती

Chinchwad News : सांगवीतील मजूर अड्ड्यावर पथनाटयातून ओमायक्राँनवर जनजागृती

Pckhabar- ओमायक्राँनच्या विळख्यात संपूर्ण जग सापडत चालले आहे. नवनवीन ओमायक्राँनचे सारखे व्हेरीयंट येत आहेत यामुळे जगाची धास्ती वाढली आहे. कोरोना पेक्षा सहा पटीने ओमायक्राँन आधिच वेगाने वाढत आहे. देशात ओमायक्राँनचे जवळपास 1400 रुग्ण आहेत. तर महाराष्ट्रत 460 रुग्ण आहेत राज्यात सध्या कोरोना बाधितांचा आकडा दहा हजारा जवळ गेला आहे. याचे गांभीर्य ओळखून दिलासा संस्था व मानवी हक्क संरक्षण आणि जाग्रतीच्या वतीने सांगवीतील मजूर अड्ड्यावर पटनाटयातुन, स्लोगण, स्पीकरद्धारे, अशिक्षित मजूरांना केले. ओमायक्राँन बाबत शिक्षीत करून जनजागृती करण्यात आली.

मानवी हक्क संरक्षण आणि जाग्रतीचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड यांनी आपल्या शर्टवर घातक कोरोनाचे चित्र काढून, नियम पाळा, ओमायक्राँन टाळा. ,माझे आरोग्य, माझी जबाबदारी.
घाबरु नका, जागरूक रहा. ओमायक्राँनची थांबवा साथ,वारंवार धुवा आपले हात. माझा मी रक्षक असे लिहिले होते आणि स्पीकरद्धारे जोगदंड नागरिकांना आव्हान करीत होते.

दिलासा संस्थेचे अध्यक्ष सुरेश कंक मजूरांना मास्क,घालण्याचे,वारंवार हात धुण्याचे, वारंवार  सँनीटाझरचा वापर करून गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचे आव्हान करीत होते.

सांगवी पिंपळे गुरव असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. प्रदिप ननवरे यांनी ओमायक्राँनची होऊ नये म्हणून घ्यावयाची दक्षता व झाल्यावर घ्यावयाची काळजी यावर मजूरांना माहिती दिली .
मानवी हक्क संरक्षण आणि जाग्रतीचे संस्थापक अध्यक्ष विकास कुचेकर यांनी कोणताही आजार झाल्यावर घरी उपाय न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने. औषध उपचार घेण्याचे आव्हान केले आपली व आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांची काळजी घ्यावी.

पटनाटयातमध्ये शहराध्यक्ष आण्णा जोगदंड, दिलासा संस्थेचे अध्यक्ष सुरेश कंक, प्रकाश घोरपडे, पंकज पाटील, मुरलीधर दळवी, विजया नागटिळक, शामराव सरकाळे यांनी सहभाग घेतला.
यावेळी 500 मास्कचे मजूरांना वाटप करण्यात आल.

पटनाटय सादरीकरण झाल्यावर कार्यक्रमाची सांगता वंदेमातरम गिताने झाली. यावेळी संस्था अध्यक्ष विकास कूचेकर, शहराध्यक्ष आण्णा जोगदंड, दिलासा संस्थेचे अध्यक्ष सुरेश कंक, सांगवी पिंगळे गुरव डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ प्रदिप ननवरे, डॉ कैलास पाटील,  पश्चिम महाराष्ट्र महिला अध्याक्षा संगिता जोगदंड,  मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरूण पवार, पिंपरी चिंचवड महीला अध्याक्षा मीना करंजावणे, उपाध्यक्ष विकास शहाणे, हनुमंत पंडीत वसंत चकटे, ऋतुजा जोगदंड, प्रकाश बंडेवार एकनाथ उगळे, डॉ पी एस अग्रवाल, शरद शेजवळ, विनायक विसपुते इत्यादी कार्येकर्ते उपस्थित होते.

प्रास्ताविक सुरेश कंक यांनी केले. आभार श्रीकांत चौगुले यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *