Pimpri News : दारू नको भाऊ…या दूध घेऊ .!! उदंड प्रतिसाद
अनेकांनी केला दारू सोडण्याचा निश्चय
Pckhabar- सरत्या वर्षाला निरोप आणी नववर्षाच्या स्वागतासाठी म्हणून विविध ठिकाणी मौजमजा करणे आणी दारूचे सेवन करण्याचे प्रकार खूप प्रमाणात वाढत असून अनेक वाद होतात, त्याचबरोबर अपघात होऊन अनेकांचे मृत्यू होत आहेत हे टाळता यावे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, कष्टकरी संघर्ष महासंघातर्फे दारू नको भाऊ..या दूध घेउ उपक्रम आयोजित करून दुधाचे वाटप करण्यात आले याला नागरिक आणि कामगारांनी उदंड प्रतिसाद दिला. अनेक कामगारांनी दारू सोडण्याचा निर्धार यावेळी केला.
३१ डिसेंबर संधेला व १ जानेवारीच्या सकाळी असा दोन वेळा हा उपक्रम घेण्यात आला. यावेळी नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक केले. देशभरामध्ये रस्ता अपघाताचे प्रमाण फार मोठ्या प्रमाणात असून यामध्ये दारू पिऊन अपघात झाल्याचे प्रमाण वाढले आहे.
दारुमुळे कामगार वर्ग आणि इतर नागरिकांमध्ये भांडणाचे प्रकार आणि कुटुंबात कलह निर्माण होत आहे. त्यामुळे दारू सोडून नवीन वर्षाचे स्वागत देशभक्तीपर गाणे लावून एक वेगळा उपक्रम करत व्यसनमुक्तिद्वारे स्वागत करूया असा संकल्प अनेकानीं केला.










Leave a Reply