Pimpri Corona News : नागरिकांनो काळजी घ्या; कोरोना रुग्ण संख्या वाढतेय
आम्ही घाबरवत नाही तर 30-35 असणारी रुग्ण संख्या आज 150 झाली
Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहरातील
कोरोना रुग्ण संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. 30-35 असणारी रुग्ण संख्या आज ( शुक्रवार) 150 झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी अधिक सतर्क राहून कोरोना व ओमायक्रोनच्या पार्श्वभूमीवर काळजी घेण्याची गरज आहे. 137 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
शहरातील एका रुग्णाचा आज मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील 2 लाख 79 हजार 136 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. सध्या 462 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 237 रुग्ण गृहविलगीकरणात असून 225 सक्रीय रुग्णांवर महापालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.
आजपर्यंत 29 लाख 66 हजार 558 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.










Leave a Reply