Chinchwad News : ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर यांच्या स्मृतींना कवितेतून उजाळा
Pckhabar- चिंचवड स्टेशन येथील सी के गोयल विद्यालयात ज्येष्ठ कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या प्रतिमेचे पूजन संस्थेचे अध्यक्ष जगदीश जाधव, व विजय जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.
शाळेच्या पहिल्याच दिवशी’ सांग सांग भोलानाथ ;”ही कविता प्रत्येक शिक्षकास सही विद्यार्थ्यांच्या ओठावर रेंगाळायची .त्याचप्रमाणे त्यांनी बाल कविता, भावकविता ,समाज कविता, भक्ती कविता ,प्रेम कविता, व नाट्य आदी प्रकार हाताळत ते अशा जागी पोहोचले की, त्यांच्याशिवाय मराठी साहित्याचा इतिहास अपुरा वाटतो. त्यापैकी काही निवडक कविता श्री महाजन बाळू यांनी विद्यार्थ्यांना कवितेतून उजाळा दिला.
याप्रसंगी प्राथमिक मुख्याध्यापक साहेबराव देवरे ,उपमुख्याध्यापक महाजन बाळू, माध्यमिक मुख्याध्यापक बाळाराम पाटील ,पर्यवेक्षक दत्तात्रय भालेराव, शरद पटेल ,किसन अहिरे आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.










Leave a Reply