शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन
Pckhabar-पुणे व पिंपरी- चिंचवड येथील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी बुधवारी ( दि. २९) उत्तर महाराष्ट्र शिवसेना समन्वयक रवींद्र मिर्लेकर आणि शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख सचिन अहिर यांची शिवसेना भवनात भेट घेतली. यावेळी मिर्लेकर आणि अहिर यांच्या हस्ते शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या कार्य अहवालाचे तसेच दिनदर्शिकेचे अनावरण करण्यात आले.
भोसरी विधानसभा शिवसेना उपशहरप्रमुख नेताजी काशीद, उपशहरप्रमुख अनिल सोमवंशी आणि शिवसेना शाखाप्रमुख प्रवीण पाटील यांच्या कार्य अहवाल व दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. शिवसेना उपजिल्हाप्रमुख निलेश मुटके, राहुल भोसले, विभागप्रमुख नितीन बोंडे, माजी उपशहरप्रमुख युवराज कोकाटे यांच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन मिर्लेकर आणि अहिर यांच्या हस्ते करण्यात आले. शिवसेना संघटक रावसाहेब थोरात, संजय गाढवे आदी उपस्थित होते.










Leave a Reply