Sports News: राष्ट्रीय फुटबॉलपटू आलोक शर्मा यांचा गौरव
Pckhabar-मानव आधार सामाजिक संघ महाराष्ट्र राज्य, या संस्थेच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त फुटबॉलपटूमधील उल्लेखनीय कामगिरीबाबत राष्ट्रीय फुटबॉलपटू आलोक शर्मा यांचा पोलीस निरीक्षक ( गुन्हे) राजेंद्र निकाळजे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. या वेळी पिंपरी चिंचवड युवा सेनेचे उप शहरअधिकारी राजेंद्र तरस, संस्थेचे संस्थापक दशरथ शेट्टी, अध्यक्ष संतोष दुधगागरे उपस्थित होते.
शर्मा यांनी फुटबॉलमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली इंद्रायणी स्पोर्ट क्लबने विविध स्पर्धांमध्ये विजेतेपद पटकावले आहे. शर्मा यांनी फुटबॉल प्रशिक्षक म्हणून अनेक फुटबॉलपटू घडविले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेले खेळाडू राष्ट्रीय, राज्यस्तरीय आणि व्यावसायिक संघातून खेळत आहेत. २०१६ साली फिफा वर्ल्ड कप स्पर्धेसाठी १७ वर्षांखालील भारतीय संघाच्या निवड समितीमध्ये शर्मा यांची निवड झाली होती. त्यावेळी त्यांनी महाराष्ट्रातून तीन खेळाडूंची निवड केली होती. यातील दोन खेळाडू आजीही भारतीय संघात खेळत आहेत.
दरम्यान, आलोक शर्मा यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल शिवसेना मावळ तालुका समन्वयक रमेश जाधव, युवा सेनेचे उप तालुका अधिकारी विशाल दांगट पाटील, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष आशिष बंसल, मनसेचे शहराध्यक्ष जॉर्ज दास, शिवसेना विभागप्रमुख विजू थोरी आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.










Leave a Reply