Pimpri News : क्रिकेट टुर्नामेंटमध्ये वसंत जॅग्वार्स संघ ठरला विजेता

Pimpri News : क्रिकेट टुर्नामेंटमध्ये वसंत जॅग्वार्स संघ ठरला विजेता

Pckhabar-इंडियन बिझनेस क्लबच्या वतीने आयोजित केलेल्या आयबीसी प्रिमियर लीग क्रिकेट टुर्नामेंटमध्ये वसंत जॅग्वार्स क्रिकेट संघाने मालिका जिंकली.

अंतिम सामन्याचा नाणेफेक वसंत जग्वार्सने टॉस जिंकल्यवर कर्णधार नागेश यादव यांनी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. 8 षटकांत वसंत जॅग्वार्सने 4 बाद 89 धावा करीत जय भवानी वॉरियर्स संघाचा पराभव केला.

विजयी संघाने ८ षटकांत 7 गडी गमावून 60 धावा करीत वसंत जॅग्वार्सने २९ धावांनी विजय मिळवला. वसंत जॅग्वार्स संघ विजेता तर जय भवानी संघ उपविजेता ठरला. बक्षीस वितरण प्रसंगी वसंत ग्रूपचे अध्यक्ष प्रेमचंद मित्तल, अरुण मित्तल, अनिल मित्तल, जयभवानी ग्रूपचे रंगनाथ गोडगे, कैलाश पारीख, सुरेंद्र आगरवाल आदी मान्यवर उपस्थित होते.

अंतिम सामन्याचा सामनावीर व मालिकावीर दीपक तिवारी ठरला.
सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक अभिषेक दाणी,
सर्वोत्तम झेल देवेंद्र जाधव,
सर्वोत्कृष्ट फलंदाज कुमार हरगुडे,तर
सर्वोत्कृष्ट गोलंदाज प्रज्वल फणसाळकर ठरला. मोशीतील हजारे मैदान येथे तीन दिवस सुरू असलेल्या या टूर्नामेंटमध्ये एस केएम ॲव्हेंजर, प्राज इंडस्ट्रीज, मित्तल रॉयल्स, जय भवानी वारियर, वसंत जॅग्वार्स, रवी इंडस्ट्रीज, निव्हा संघ, आयबीसी शार्प वेल्डींग असोसिएशन हे संघ सहभागी झाले होते.

या स्पर्धेसाठी एसकेएम स्टील,वसंत ग्रूप, विहान पाईप, एव्हीएन्स डोअर्स यांचे विशेष सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *