Pune District News : कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत “महिला सबलीकरण ” उपक्रम
Pckhabar- लायन्स क्लब्स इंटरनॅशनल,पिंपरी चिंचवड महानगरपालिका व युनिक स्किल डेव्हलोपमेंट संस्था यांच्या कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत “महिला सबलीकरण ” हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
आजच्या “इलेक्ट्रॉनिक युगात ” उद्योग क्षेत्रासाठी आवश्यक असलेल्या कौशल्याचे प्रशिक्षण देणे व त्यामुळे व्यवसाय अथवा नोकरीची संधी उपलब्ध करणे ही उद्दिष्ट्ये ठरवून खालील प्रशिक्षण आयोजित करण्यात आली आहेत.
1)PCB assembly operator
2)Wire harness assembly operator
3)connector assembly operator
4)Electrical technicians
यशस्वी प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर केंद्रीय इलेक्ट्रॉनिक विभागाचे मान्यताप्राप्त सर्टिफिकेट देण्यात येईल.या
संधीचा गरजूंना लाभ करवून द्यावा व त्यांचे आयुष्य घडविण्यास हातभार लावावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रशिक्षणाची माहिती व प्रवेशासाठी
पुणे 8888365586, पिंपरी चिंचवड 9822085258, रांजणगाव 8237012701 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन लायन ओमप्रकाश पेठे, लायन अशोक येवले, बाळासाहेब झरेकर, विजय कुलकर्णी यांनी केले आहे.










Leave a Reply