Election News : निवडणूक प्रक्रियेला सुरुवात; प्रभाग रचनेचा परिशिष्टासह कागदोपत्री अहवाल सादर करा

Election News : निवडणूक प्रक्रियेला सुरुवात; प्रभाग रचनेचा परिशिष्टासह कागदोपत्री अहवाल सादर करा

6 जानेवारीला आराखडा सादर करावा लागणार

Pckhabar- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा 6 डिसेंबर रोजी निवडणूक आयोगाला साॅफ्ट काॅपीच्या माध्यमातून सादर केला होता. मात्र, निवडणूक आयोगाने आता भौगोलिक सिमा, प्रभागाची लोकसंख्या, एसटी, एसी आरक्षण निश्चिती करून प्रभाग रचनेचा
परिशिष्टासह कागदोपत्री अहवाल सादर करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाचे प्रभारी सचिव अविनाश सणस यांनी महापालिका आयुक्तांना आज बुधवारी दिले आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभागाचा कच्चा आराखडा निवडणूक आयोगाच्या आदेशाप्रमाणे तयार करून सादरही केला आहे. तसेच या आराखड्यामध्ये निवडणूक आयोगाने काही प्रमाणात बदल केले आहेत. मात्र, महापालिकेच्या निवडणुक विभागाने यापुर्वी पेन ड्राईव्हच्या माध्यमातून कच्चा आराखडा निवडणूक विभागाला दिला होता. आता 1 ते 8 परिशिष्टासह कागदोपत्री अहवाल सादर करावा. या आराखड्यामध्ये प्रभागाच्या भौगोलिक सिमा, प्रभागाची लोकसंख्या, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी आरक्षित असलेल्या प्रभागाच्या आरक्षणासह माहिती देण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. तसेच सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार मागासवर्ग प्रभागाच्या जागा देय न करता सर्वसाधारण जागांप्रमाणे या जागा भरण्याचे नियोजन करावे, असेही निवडणूक आयोगाच्या आदेशात म्हटले आहे.

दरम्यान, पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी 46 प्रभाग होणार असून नगरसेवक संख्या 139 असणार आहे. यामध्ये एसटी आरक्षणाचे तीन जागा असणार आहेत. यामध्ये दोन महिला तर एक पुरुष असणार आहे. एसी आरक्षणाच्या 22 जागा असणार आहेत. 70 महिलांना यामध्ये संधी मिळणार असून 69 पुरुषांना संधी मिळणार आहे.

याबाबत महापालिका निवडणुक विभागाचे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब खांडेकर म्हणाले ” निवडणुक आयोगाच्या आदेशाप्रमाणे कार्यवाही करण्यात येत आहे. 6 जानेवारी 2022 रोजी आयोगाला कागदोपत्री आराखडा सादर करण्यात येणार आहे. ”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *