पिंपरी-चिंचवड शहरात आज 1 हजार 52 नवे रुग्ण, 15 जणांचा मृत्यू
Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहरात बुधवारी कोरोनाचे 1 हजार 52 नवे रूग्ण आढळले. शहरात कोरोना रूग्ण संख्येने 31 हजारी ओलांडली आहे. तर 15 जणांचा मृत्यू झाला. एकाच दिवशी 207 जणांना घरी सोडण्यात आले आहे.
शहरात 31 हजार 643 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. 6 हजार 130 सक्रीय रूग्णांवर उपचार सुरू आहेत. शहरात बुधवारअखेर 22 हजार 5 जण कोरोनामुक्त झाले आहेत. आत्तापर्यंत 642 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये मनपा हद्दीतील 525 तर 117 मनपा हद्दीबाहेरील आहेत.
बुधवारी 1 हजार 627 संशयित रूग्णांना महापालिकेच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. 603 जणांचे अहवाल निगेटीव्ह आले. 2 हजार 460 जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत.
आज 15 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामध्ये भोसरी (पुरुष 60 वर्षे, पुरुष 29 वर्षीय युवक), रहाटणी (स्त्री 70 वर्षे), आकुर्डी (पुरुष 51 वर्षे), थेरगाव (स्त्री 64 वर्षे, पुरुष 70 वर्षे, पुरुष 32 वर्षे), कासारवाडी (पुरुष 66 वर्षे), मोरेवस्ती चिखली (स्त्री 80 वर्षे), निगडी प्राधिकरण (स्त्री 89 वर्षे), जाधववाडी चिखली (पुरुष 65 वर्षे), नेहरुनगर पिंपरी (स्त्री 75 वर्षे), च-होली फाटा (पुरुष 81 वर्षे), चिंचवड (पुरुष 70 वर्षे), काळेवाडी (पुरुष 72 वर्षे)










Leave a Reply