Chikhali News: चिखली येथील ह.भ. प. राजू महाराज ढोरे यांना ‘समाजरत्न’ पुरस्कार

Chikhali News: चिखली येथील ह.भ. प. राजू महाराज ढोरे यांना ‘समाजरत्न’ पुरस्कार

– पुणे येथील टिळक स्मारक मंदिरात गौरव समारंभ
Pckhabar-राज्यस्तरीय गुणिजन गौरव महापरिषदेच्या वतीने दिला जाणारा समाजरत्न पुरस्कार टाळगाव चिखली येथील ह.भ.प. राजू महाराज ढोरे यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.
दरवर्षी शैक्षणिक सामाजिक तसेच आध्यात्मिक व औद्योगिक अशा विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय काम करणार्‍या व्यक्तींची निवड या पुरस्कारासाठी केली जाते. २०२१ मध्ये शैक्षणिक सामाजिक व अध्यात्मिक अशा क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय काम करणारे तसेच जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीमधील रथाचे सेवेकरी असणारे  चिखली येथील रहिवासी तसेच जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठाचे संचालक  ह.भ.प. राजू महाराज ढोरे यांना हा समाजरत्न पुरस्कार पुणे येथील टिळक स्मारक मंदिरात सन्मानपूर्वक  प्रदान करण्यात आला.

या प्रसंगी मनुष्यबळ लोकसेवा अकादमी त्याचबरोबर राज्यस्तरीय गुणिजन गौरव महापरिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी सर्व गुणीजनांना समाजामध्ये  भविष्यामध्ये उल्लेखनीय काम करण्याबाबत शपथ देण्यात आली. मानपत्र, मानाचा फेटा, सुवर्णपदक, सन्मानचिन्ह व महावस्त्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते.  समाजरत्न पुरस्काराने टाळगाव चिखलीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवल्याचे गौरोवोद्गार समस्त टाळगांव चिखलीच्या ग्रामस्थांनी काढले.

पिंपरी-चिंचवड भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे, संत साहित्याचे गाढे अभ्यासक व जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठाचे संचालक डॉ. सदानंद मोरे, संतपीठाचे संचालक व संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदीचे विश्वस्त डॉ. अभय टिळक, संतपीठाच्या संचालिका स्वाती मुळे, अभ्यासक प्राचार्य ज्ञानेश्वर गाडगे, तसेच टाळगाव चिखलीमधील सर्व ग्रामस्थांनी ह.भ.प. राजू महाराज ढोरे यांचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *