Talegaon Dabhade News : जनसेवा चषक 2021 टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत आज सायंकाळी रंगणार अंतिम सामना

Talegaon Dabhade News : जनसेवा चषक 2021 टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत आज सायंकाळी रंगणार अंतिम सामना

Pckhabar- जनसेवा चषक 2021
डे-नाईट फुलपिच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत आज सायंकाळी अंतिम सामना रंगणार आहे.

जनसेवा विकास समितीतर्फे ‘जनसेवा चषक 2021’ डे-नाईट फुलपिच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा  तळेगाव-एम. आय. डि.सी रोड,  यशवंत क्रिकेट मैदानावर ही होत आहे. स्पर्धेतील आज सायंकाळी अंतिम सामना रंगणार आहे. या सामन्यासाठी जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे, नगरसेवक निखिल भगत यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

ही स्पर्धा दि. 22 डिसेंबरपासून सुरू या आहे. या स्पर्धेत 32 संघांनी सहभाग घेतला आहे. या स्पर्धेला विरचक्र मित्र मंडळ, तळेगाव स्टेशन आणि निखिलदादा भगत स्पोर्टस् फाऊंडेशन यांचे सहकार्य लाभले आहे.

या स्पर्धेतील प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या संघाला 3 लाखाचे, व्दितीय क्रमांक संघाला 2 लाखाचे, तृतीय क्रमांक संघाला 1 लाख तर चतुर्थ क्रमांक संघाला 50 हजारांचे बक्षीस देण्यात येणार आहे. ही सर्व बक्षिसे जनसेवा विकास समितीतर्फे  देण्यात येणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *