व्यायामशाळा सुरू करण्यासाठी शिवसेना नेत्यांना साकडे
Pckhabar- राज्यात व्यायामशाळा पुन्हा चालू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र , राज्य सरकारकडून त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. त्यामुळे या व्यवसायावर अवलंबून असणारे आर्थिक अडचणीत आले आहेत. त्यामुळे हा प्रश्न दोडविण्यासाठी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख तथा कामगार नेते इरफान सय्यद आणि महाराष्ट्र जिम ओनर असोसिएशनचे निलेश मोरे यांनी नुकतीच शिवसेना सचिव, खासदार अनिल देसाई यांची मुंबईत भेट घेऊन, त्यांच्यापुढे जिमचालकांच्या समस्यांचे गार्हाणे मांडले.
महाराष्ट्रातील साधारणपणे 15000 जिम चालक, मालक, हे गेल्या पाच महिन्यापासून बेरोजगार आहेत सर्व जिमचालकांनी जिम चालू करण्यासाठी विशेष नियमावलीदेखील तयार केली आहे. जिमचालक स्वतः वरील सर्व नियमांचे पालन करून जिम चालू करण्यास तत्पर आहेत. राज्य शासनाने सहानुभूतीपूर्वक जिमचालकांच्या मागण्या मान्य कराव्यात. तसेच जिमचालकांना सुरुवातीच्या समस्यांना तोंड देण्यासाठी शासनाकडून आर्थिक सहकार्य मिळावे, अशी मागणी खा. देसाई यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.










Leave a Reply