क्वीन्स टाउन सोसायटीने उभारले कोविड केंद्र
Pckhabar-चिंचवड येथील क्वीन्स टाउन हाऊसिंग सोसायटीच्या वतीने उभारण्यात आलेल्या 40 बेडसच्या कोविड केंद्राचे उद्घाटन अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी सोसायटीचे अध्यक्ष सुजीत पाटील, सचिव शिरीष पोरेड्डी, खजिनदार युजीन वराडकर आदी कार्यकारी मंडळ आदी उपस्थित होते. वैद्यकीय टिमप्रमुख डॉ.विजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ अभिक्षित काळे, डॉ योगेश आगरवाल हे काम पाहत आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव वाढत आहे. वाढत्या रुग्णांना रुग्णालयाकडून मिळणार्या अपुर्या सुविधा लक्षात घेऊन क्वीन्स टाउन सोसायटीने पालिकेची परवानगी घेवून हे सेंटर उभारण्यात आले आहे, अशी माहिती अध्यक्ष सुजीत पाटील यांनी दिली. यावेळी कोविड सेंटरमध्ये 40 बेड, रुग्णास औषधी, गोळ्या, चहा नाष्टा, जेवण, रुग्णवाहिका, तज्ञ डॉक्टर्स अशा सुविधा उपलब्ध करून दिल्या आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सुरेश गारगोटे मानले.










Leave a Reply