Chikhali Political News : चिखलीत शिवसेनेचे उमेदवार निवडून आणणार

Chikhali Political News : चिखलीत शिवसेनेचे उमेदवार निवडून आणणार

मोरेवस्ती येथील बैठकीत शिवसैनिकांचा निर्धार

Pckhabar-आगामी महापालिका निवडणुकीच्या प्राश्वभूमीवर भोसरी विधानसभा मतदारसंघातील शिवसेना शाखा त्रिवेणीनगर, ताम्हाणे वस्ती, म्हेत्रे वस्ती, आणि मोरेवस्ती या भागातील शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांची बैठक साने चौक येथे बुधवारी ( दि. २२) सायंकाळी पार पडली. यावेळी चिखली प्रभागात शिवसेनेचे नगरसेवक निवडून आणण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला.

या बैठकीत शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी आपली मते मांडली. यात प्रामुख्याने आगामी महापालिका निवडणुकीतील संभाव्य प्रभागरचना, निवडणुकीची रणनीती, पक्ष संघटना बळकटीकरण यावर चर्चा करण्यात आली. तसेच चिखली प्रभागात शिवसेनेचे निवडून आणण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन तयारीला लागण्याचा निर्धार करण्यात आला.

बैठकीचे संयोजन जेष्ठ शिवसैनिक सुर्यकांत देशमुख यांनी केले.
यावेळी रावसाहेब थोरात, नेताजी काशिद, सर्जेराव भोसले, राहुल भोसले, अशोक जाधव, सतिश डिसले, संजय गाढवे, हरिभाऊ लोहकरे, दादा ठाकरे, आनंद हिंगे, अनंत मते, देवा कुलकर्णी, संदेश दळवी, सुजीत साळवी, प्रवीण पाटील, विजय शिवपुजे, अशोक गायकवाड, आबा पांचाळ, सुजीत तांबोळी, वैभव छाजेड, बाळासाहेब नाखाडे, गोविंद गोरडे, नवनाथ गुळवे, चंद्रकांत माने, प्रमोद हेपट, चेतन सावंत, आबा कापसे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *