Nigdi News : प्राधिकरणात एक दिवसीय साहित्य संमेलन

Nigdi News : प्राधिकरणात एक दिवसीय साहित्य संमेलन
Pckhabar- नगरसेविका शर्मिला बाबर, शब्दरंग साहित्य कट्टा (प्राधिकरण) आणि रुपेरी कडा यांच्या संयुक्त विद्यमाने २८ डिसेंबर रोजी सकाळी ०९ ते सायंकाळी ०७ या कालावधीत मनोहर वाढोकर सभागृह, ज्ञान प्रबोधिनी विद्यालय, पेठ क्रमांक २५, निगडी प्राधिकरण येथे एक दिवसीय पहिले मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे.

संमेलनाध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक विनिता ऐनापुरे असून पिंपरी-चिंचवड महापालिका महापौर उषा उर्फ माई ढोरे उद्घाटक आहेत. संमेलनात पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, नगरसेविका शैलजा मोरे, भारतीय विचार साधना (पुणे) अध्यक्ष डॉ. गिरीश आफळे यांची प्रमुख उपस्थिती राहील. पुस्तक प्रकाशन, परिसंवाद, मनोरंजन, स्वगत, नाट्यछटा, एकपात्री सादरीकरण, अभिवाचन आणि काव्यकट्टा या विनाशुल्क असलेल्या साहित्यसत्रांचा लाभ सर्व रसिकांनी आवर्जून घ्यावा, असे आवाहन निमंत्रक राजेंद्र बाबर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *