Bhosari News: जिद्द ,परिश्रम करण्याची तयारी सकारात्मक विचार आणि एकाग्रता ही ध्येयपूर्तिची चतु: सूत्री -: प्रा. डाॅ. अशोककुमार पगारिया
Pckhabar- उद्दिष्ट व परिश्रम यांचा समन्वय साधल्यास ध्येय काढता येईल परिश्रमाशिवाय कोणतीही गोष्ट साध्य होत नाही म्हणून प्रत्येक व्यक्तीने आपल्या जीवनामध्ये परसराम हे प्रमाण मानून काम केल्यास ध्येय गाठता येईल, असे प्रतिपादन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ.अशोककुमार पागारीया यांनी केले.
भोसरी येथील भगवान महावीर एज्युकेशन सोसायटीच्या प्रीतम प्रकाश कला आणि वाणिज्य महाविद्यालया मध्ये प्रथम वर्ष कला आणि वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. या समारंभासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. डॉ.अशोककुमार पगारिया महाविद्यालयाचे प्राचार्य सदाशिव कांबळे, प्रशासकीय अधिकारी प्रा. पांडुरंग भास्कर व परीक्षा अधिकारी प्रा. डॉ. विजय निकम उपस्थित होते.
आपल्या प्रास्ताविकात प्राचार्य सदाशिव कांबळे यांनी विद्यार्थ्यांना या स्वागत समारंभा विषयी माहिती दिली विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासासाठी कशा प्रकारे महाविद्यालय कार्य करत आहे याची कल्पना दिली.
प्रा. पांडुरंग भास्कर यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांना प्रवेशा संदर्भात मार्गदर्शन केले प्रवेशा संदर्भात विद्यापीठाचे परिपत्रक तसेच शैक्षणिक पात्रतेची माहिती दिली. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी अजूनही आपला प्रवेश निश्चित करावा यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावेत जे विद्यार्थी बारावी उत्तीर्ण होऊनही शिक्षणापासून दूर आहेत किंवा ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला नाही अशा विद्यार्थ्यांना प्रवाहात आणण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावे असे मत त्यांनी व्यक्त केले.
परीक्षा अधिकारी डॉ. विजय निकम यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षाची व परीक्षा फॉर्म भरणे या संदर्भात माहिती दिली.
टी.वाय.बी. कॉम मधील अजय साळुंखे व सौरभ परदेशी या विद्यार्थ्यांनी आपले महाविद्यालय व शिक्षकांविषयीचे मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. सचिन पवार यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रा. रूपाली आगळे यांनी आभार मानले.
सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा.उमेश लांडगे, प्रा.प्रशांत रोकडे, सुधाकर बैसाणे, प्रा. प्रवीण म्हस्के, प्रा.विभा ब्राह्मणकर, डॉ.स्वाती वाघ शिक्षकेतर कर्मचारी सारिका बेलदोर, एकता महिंद्रकार, रूपाली मोटे यांनी परिश्रम घेतले.










Leave a Reply