Chikhali News : छत्रपती शिवाजी महाराज पुतळा विटंबनेचा चिखलीत निषेध

Chikhali News : छत्रपती शिवाजी महाराज पुतळा विटंबनेचा चिखलीत निषेध
शिवरायांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या हकालपट्टीची मागणी
Pckhabar- बंगळुरू येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा विटंबनेचा शिवसेनेच्यावतीने चिखली येथील  म्हेत्रे वस्ती, मोरेवस्ती, ताम्हाणे वस्ती येथे निषेध  करण्यात आला. यावेळी  शिवाजी महाराजांच्या पुतळयाला  जलाभिषेक व दुग्धाअभिषेक  करून पूजन करण्यात आले.

महाराष्ट्र वितरक सेनेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब थोरात, शिवसेना उपशहरप्रमुख नेताजी काशिद, शहर संघटक सचिन सानप, विधानसभा अध्यक्ष अनिल सोमवंशी, यशवंत कान्हेरे, तानाजी गायकवाड यांनी तीव्र शब्दांत निषेध  नोंदवून कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या हकालपट्टीची मागणी केली. त्यानंतर शिववंदना घेण्यात आली. उपस्थित  शिवभक्तांनी ‘जय भवानी जय शिवाजी’च्या जयजयकाराने  परिसर दुमदुमून टाकला होता.

यावेळी सर्जेराव भोसले, युवराज कोकाटे, राहुल भोसले, संजय गाढवे, सुखदेव नरळे, दादा ठाकरे, ऋषीकेश जाधव, अशोक गायकवाड, सुमंत तांबे, सुर्यकांत देशमुख, संभाजी बालघरे, गणेश भुजबळ, विजय शिवपुजे, नितीन बोंडे, चेतन सावंत, देवा कुलकर्णी,  आबा पांचाळ आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *