Chinchwad News : भाजपचे नगरसेवक तुषार कामटे म्हणतात रस्त्यावर खड्डे पडल्यास जबाबदार अधिकाऱ्याला 20 हजार दंड आकारा…!

Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिक मिळकत कर, पाणी पट्टी यासह आदी कर महापालिकेला वेळेवर भरत असतात. त्या मानाने महापालिका प्रशासन करदात्यांना मुलभूत सुविधा देण्यात अनेक वेळा असमर्थ ठरते. याचा त्रास करदात्या नागरिकांना होतो. मात्र, नागरिकांनी नियम मोडल्यास त्यांना दंड आकारला जातो. त्याप्रमाणे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीत रस्त्यावर खड्डे पडल्यास संबंधित जबाबदार अधिकाऱ्याला 20 हजार दंड, सिग्रल नादुरूस्त झाल्यास संबंधित जबाबदार अधिकाऱ्याला 10 हजार रुपये दंड आकारावा, अशी उपरोधिक मागणी
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 26 चे महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक तुषार गजानन कामठे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एक पोस्ट करत केली आहे.

नगरसेवक तुषार कामटे आपल्या पोस्टमध्ये म्हणतात…
रस्त्यावर खड्डे : संबंधित जबाबदार अधिकारी दंड 20000
अतिक्रमित फुटपाथ : संबंधित जबाबदार अधिकारी दंड 20000
रस्त्यावर अंधार : जबाबदार अभियंत्याला दंड 25000
रस्त्यावर कचरा पडून आहे : संबंधित जबाबदार अधिकारी, दंड 25000
रस्त्यावर विजेचे पोल नाहीत: संबंधित जबाबदार अधिकारी, दंड 30000
खोदलेले रस्ते बनवले नाहीत: संबंधित जबाबदार अधिकारी, दंड 35000
खड्यात पडून दुखापत होणे: संबंधित जबाबदार अधिकारी दंड = दवाखाना खर्च + 5000/- रोज जोपर्यंत बरे वाटत नाही
ही माहिती जास्तीत जास्त नागरिकांनी शेअर करावी, असे आवाहन पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 26 चे महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक
तुषार गजानन कामठे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एक पोस्ट करत केले आहे.










Leave a Reply