Pimpri News : लायन्स क्लब्स इंटरनॅशनल कौशल्य विकास उपक्रमास कर्नाटकात उत्स्फूर्त प्रतिसाद
Pckhabar- प्रेरणा बंधू श्री सदाशिव कुंभार यांनी जय जिनेंद्र एज्युकेशन ट्रस्ट संचालित कन्नड मेडीयम प्राथमिक शाळा, उगार बुद्रुक, तालुका कागवड,जिल्हा बेळगावी, कर्नाटक येथे दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी “मोजमाप पद्धती व परिमाणे “या विषयावर शुक्रवार दिनांक १७ डिसेंबर २०२१ रोजी कार्यशाळा घेतली.
या कार्यशाळेत ३० विद्यार्थ्यांसमवेत शिक्षकांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
शाळेचे मुख्याध्यापक अभयकुमार देसाई यांनी कार्यक्रमाचे उदघाटन केले. या उपक्रमाचा विद्यार्थ्यांना भावी आयुष्यात नक्की उपयोग होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विविध विषयावर कार्यशाळेचे आयोजन करून विद्यार्थ्यांमध्ये शिकण्याची आवड निर्माण करावी, असे आवाहन त्यांनी प्रेरणा बंधू कुंभार यांना केले व त्यास कुंभार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
संख्या मोजणी, वजन, द्रव पदार्थाचे आकारमान व अंतराची मोजणी सोप्या भाषेत समजावून सांगितल्याने विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला. हेच विद्यार्थी इतर वर्गांना मोजमाप पद्धती समजावून सांगणार आहेत.
या उपक्रमाचा समारोप माजी प्रांतपाल व कौशल्य विकास उपक्रमाचे मार्गदर्शक एम जे एफ लायन ओमप्रकाश पेठे यांनी केला. प्रेरणा कौशल्य विकासच्या माध्यमातून आयोजित कार्यशाळेचे त्यांनी कौतुक केले व सदाशिव कुंभार यांचे आभार व्यक्त केले.
एम जे एफ लायन प्रदीप कुलकर्णी यांनी कार्यशाळांसाठी लागणाऱ्या मदतीचे आश्वासन दिले. कौशल्य विकास प्रमुख एम जे एफ लायन अशोक येवले यांनी मुख्याध्यापक अभयकुमार देसाई, शिक्षक व विद्यार्थ्यांनी कौशल्य विकास कार्यशाळेस उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार मानले व हा उपक्रम वेळोवेळी राबविला जाईल असे आश्वासन दिले.










Leave a Reply