पार्थच्या बोलण्याला कवडीचीही किंमत देत नाही – शरद पवार

 पार्थच्या बोलण्याला कवडीचीही किंमत देत नाही – शरद पवार

Pckhabar- सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी सीबीआय चौकशी करण्याची मागणी पार्थ पवार यांनी केली होती. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नातू पार्थ हा इममॅच्युअर असून त्यांच्या बोलण्याला कवडीचीही किंमत देत नसल्याची अशी प्रतिक्रिया दिली आहे.

 पार्थ पवार यांनी काही दिवसांपूर्वीच राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन सुशांत सिंह राजपूत प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी केली होती. तशा आशयाचं पत्र त्यांनी गृहमंत्र्यांना दिले होते.

याबाबत शरद पवार यांनी पार्थ पवार यांच्याबाबत कठोर भूमिका घेत पार्थ यांना चांगलेच फटकारले आहे. शरद पवार म्हणाले की, माझ्या नातवाच्या बोलण्याला कवडीचीही किंमत नाही. ते इममॅच्युअर आहेत. सीबीआय चौकशी कोणाला करायची असेल, तर माझा महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांवर 100 टक्के विश्वास आहे. पण कोणाला सीबीआय चौकशीची मागणी करायची असेल त्यासाठी कोणाचा विरोध नसावा.
दरम्यान, पार्थ पवार यांनी तीन दिवसांपुर्वीच श्रीराम मंदिराला शुभेच्छा दिल्या होत्या. त्यामुळेच शरद पवार  पार्थ पवार यांच्यावर नाराज असल्याचे समजते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *