Dehugaon Crime News : परंडवाल चौकातील कपड्याचे दुकान फोडले; तीन दुकानाचे शटर उचकटून चोरी करण्याचा प्रयत्न फसला

Dehugaon Crime News : परंडवाल चौकातील कपड्याचे दुकान फोडले; तीन दुकानाचे शटर उचकटून चोरी करण्याचा प्रयत्न फसला


Pckhabar- कपड्याच्या दुकानाचे शटर उचकटून अज्ञात चोरट्याने दुकानातील 4 हजार 700 रूपये चोरून नेले. तसेच या दुकानाशेजारील तीन दुकानाचे शटर उचकटून चोरी करण्याचा प्रयत्न केला. ही घटना बुधवारी पहाटे सव्वा चारच्या सुमारास देहूगाव येथील परंडवाल चौकात घडली.

किरण नवनाथ काळंगे (वय-40, रा. परंडवाल चौक, देहूगाव) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे परंडवाल चौकात ओम क्रिएशन नावाचे कपड्याचे दुकान आहे. या दुकानाचे शटर उचकटून अज्ञात चोरट्याने दुकानातील 4 हजार 700 रूपये चोरून नेले.

तसेच फिर्यादी यांच्या दुकानाशेजारील देवा इलेक्ट्रीकल, संत कृपा मेडिकल, शुभम ज्वेलर्स या दुकानांचे शटर उचकटून चोरी करण्याचा प्रयत्न केला. देहूरोड पोलीस तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *