Chinchwad News : चांगले कार्य करणाऱ्या तरुणाचा सन्मान होणे आवश्यक : पद्मश्री गिरीश प्रभुणे

Pckhabar-आजच्या तरुण पिढीला दोष देणारे अनेकजण भेटत परंतु यामध्ये चांगले कार्य करणाऱ्या तरुणाचा उल्लेख कमी प्रमाणत होताना दिसतो, चांगले कार्य करणाऱ्यांचा सन्मान करून त्यांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक, पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी केले.
केशवनगर, चिंचवड येथील पुनरुत्थान समरसता गुरुकुलम्मध्ये मंगळवारी आयोजित एका कार्यकमात ते बोलत होते. यावेळी देहू रोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र निकाळजे, राजे प्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी बालघरे, गणेश भुजबळ, हेल्प सोशल फाऊंडेशन नितीन कांबळे, प्रशांत काळे, सुचिता पाटील, पल्लवी बुरुड, स्वप्निल पाटील, समाधान भंडारे, नितीन पाटील, समु बुरड आदी मान्यवर उपस्थित होते.
निकाळजे म्हणाले, समाजातील वंचित घटकासाठी प्रभुने यांनी जे कार्य केले आहे, त्याची दखल घेत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान केला आहे. त्यांच्या कामाचा प्रत्येकाने आदर्श घ्यावा. नितीन कांबळे म्हणाले, आनंद हा कुठेही विकत मिळु शकत नाही म्हणुन आजच्या तरुण पिढीने समाजहिताच्या कार्यासाठी पुढे यावे.










Leave a Reply