Nigdi Accident News : अज्ञात वाहनाच्या धडकेत होमगार्डचा मृत्यू

Nigdi Accident News : अज्ञात वाहनाच्या धडकेत होमगार्डचा मृत्यू


pckhabar- दुचाकीवरून जाणार्‍या एका होमगार्डचा अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. ही घटना रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास निगडीतील पवळे पुलावर घडली.
तेजस ओमप्रकाश लेले (वय-32, वडगाव, मावळ) असे मृत्यू झालेल्या होमगार्डचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचा आते भाऊ देवेंद्र अरूण कुरूमभट्टी (वय-35, रा. तळेगाव दाभाडे) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तेजस हे रविवारी रात्री वडगाव मावळ येथे (एमएच-14, जेव्ही. 1475) या दुचाकीवरून जात होते. त्यावेळी निगडीतील पवळे पुलावर भरधाव अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यामुळे तेजस यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली. यामध्येच त्यांचा मृत्यू झाला. वाहन चालक घटनास्थळी न थांबता पळून गेला. निगडी पोलीस तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *