Pimpri Political News : ‘नामदेव ढाके यांनी आपली उंची तपासून भाष्य करावे’
माजी खासदार गजानन बाबर यांचे पक्षनेते नामदेव ढाके यांना प्रतिउत्तर

Pckhabar- पुणे जिल्ह्याचे शिवसेना संपर्कप्रमुख तथा माजी मंत्री सचिन अहिर यांच्यावर टीका करण्यापूर्वी पिंपरी महापालिकेतील भाजपचे पक्षनेते नामदेव ढाके यांनी आपली स्वतःची उंची तपासावी व त्यानंतर भाष्य करावे, अशी टीका मावळचे शिवसेनेचे माजी खासदार गजानन बाबर यांनी केली आहे. राज्य सरकारने केलेली दहा कामे दाखवावी अशी स्टंटबाजी करून नागरिकांची दिशाभूल करू नये. सध्या सत्तेत असलेले महाविकास आघाडी सरकार हे कोरोना सारखी भयावह परिस्थिती असताना देखील उत्तमरित्या कार्य करत आहे यामुळे विरोधात असलेल्या भाजपला याची चिंता वाटू लागली आहे हे यातून स्पष्ट होते, असेही बाबर म्हणाले.

याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात माजी खासदार गजानन बाबर यांचा खरपूस समाचार घेतला आहे. त्यांनी आपल्या निवेदनात सरकारच्या 14 कामाची यादीत जनतेसमोर मांडली आहे.
महाविकास आघाडीने अनेक महत्वाचे निर्णय घेऊन राज्यातील सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्याचे काम केले आहे व करत आहे. सरकारने सर्वसामान्य नागरिकांच्या घरांना न्याय मिळण्यासाठी तसेच गुंठेवारी नियमितीकरण करून सर्वसामान्यांची घरे अधिकृत करण्याचा निर्णय घेण्यात आला. या आदेशामुळे लाखो पिंपरी-चिंचवड तसेच महाराष्ट्रातील 31 डिसेंबर 2020 पूर्वीच्या अनधिकृत बांधकामांना अभय मिळणार आहे यामुळे याचा फायदा राज्यातील लाखो नागरिकांना होणार आहे.
तत्कालीन भाजप सरकारने 2017 रोजी अध्यादेश काढून पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांची दिशाभूल केली शहरांमध्ये साखर पेढे वाटले परंतु वास्तविकता शंभर अर्जही नागरिकांचे महानगरपालिकेमध्ये दाखल झाले नाहीत ही वस्तुस्थिती आहे. गुंठेवारीचा नागरिकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न फक्त महाविकास आघाडी सरकारने सोडवला हेही आपण लक्षात घेतले पाहिजे.
आपण पाहिले असेल कोरोना या महाभयंकर साथीने संपूर्ण विश्वाला ग्रासले आहे ,जवळपास दोन अडीच वर्ष झाले आपण या कोरोना साथीशी लढा देत आहोत, अशा परिस्थितीत माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांनी ही परिस्थिती अतिशय उत्तमरित्या हाताळली, यामध्ये महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांनी चांगली साथ दिली, आपण जर लसीकरणाचा विचार केला तर महाराष्ट्र राज्य हे देशामध्ये अग्रेसर आहे हे आपल्याला नाकारून चालणार नाही, अशी चांगली परिस्थिती हाताळल्यामुळे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र भाई मोदी साहेब यांनीही मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले याचाही विसर पिंपरी-चिंचवड शहरातील भाजप नेत्यांना पडलेला दिसतो.
कोविड काळामध्ये निधन झालेल्या नागरिकांसाठी त्यांच्या नातेवाईकांना रुपये 50000 सानुग्रह मदत करण्याचा निर्णय राज्य शासनामार्फत घेण्यात आला.
कोरोना संसर्गाच्या दुसर्या लाटेचा तडाखा महाराष्ट्राला सर्वाधिक बसला विशेषता ग्रामीण भागाला जास्त प्रमाणात बसला, कोवीड उपचारासाठी खासगी रुग्णालयांमध्ये येणार्या अव्वाच्या सव्वा खर्च थांबवण्यासाठी आणि सर्वसामान्यांना दिलासा देण्याच्या दृष्टिकोनातून खासगी रुग्णालयांच्या उपचाराचे दर निश्चित करण्यात आले याबाबत शासनाने आधिसुचनेचे काटेकोरपणे आणि परिणामकारक अंमलबजावणी व्हावी यासाठी सर्व जिल्हाधिकारी व महानगरपालिका आयुक्त यांना सूचना केल्या खाजगी रुग्णालयात कोविड बाधित रुग्णांसाठी 80 टक्के बेड राखीव ठेवण्याचे आदेश देण्यात आले व त्यांना शासनाने निश्चित केलेल्या दरानुसार शुल्क आकारावेत अशी अधिसूचना शासनाने काढली, ही अधिसूचना शासनाने 30 एप्रिल 2020 रोजी काढली तसेच त्याला मुदतवाढ 21 मे 2020 रोजी देण्यात आली. वरील सर्व बाब पाहता सर्वसामान्य नागरिकांना त्रास होऊ नये याची खबरदारी, काळजी शासन कोरोना काळामध्ये घेत आहे ही वस्तुस्थिती आहे.
कोरोना संबंधित कर्तव्य बजावताना मृत्यू होणार्या कर्मचार्यांना उदाहरणार्थ जिल्हा प्रशासन, पोलीस होमगार्ड ,अंगणवाडी कर्मचारी, लेखा व कोषागर इ ,अन्न व नागरी पुरवठा, पाणीपुरवठा व स्वच्छता, घरोघरी सर्वेक्षणासाठी नेमलेले कर्मचारी इत्यादी यांना 50 लाख रुपयांचे विमाकवच राज्य शासनाने दिले हा महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला ही वस्तुस्थिती आहे अशा आशयाचे परिपत्रक वित्त मंत्रालय, महाराष्ट्र शासनाने 29 मे 2020 रोजी पारित करून वरील सर्व कोरूना परिस्थितीतील लढणार्या कर्मचार्यांना न्याय राज्यशासनाने दिला.
महाविकास आघाडी सरकारने शेतकर्यांसाठी महाडीबीटी पोर्टल चालू केले तसेच विकेल ते पिकेल या योजनेची सुरुवात करण्यात आली, मुख्यमंत्री कृषी सिंचन योजना, नाबार्ड यांची प्रभावीपणे अंमलबजावणी तसेच महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत राज्यात 30.77 लाख शेतकर्यांना 19 हजार 644 कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले. अतिवृष्टी बाधित शेतकर्यांना दहा हजार रुपये तर फळ उत्पादकांना 25 हजार रुपये प्रति हेक्टर प्रमाणे मदत करण्यात आली.
शिक्षण विभागातर्फे 2021/ 22 चा शैक्षणिक वर्षासाठी शाळांच्या फीमध्ये 15 टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला सर्व शाळांमध्ये मराठी विषय सक्तीचा करण्यात आला हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
नागरिक ,महिला ,वृद्धांना तातडीने मदत मिळावी म्हणून आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा तयार करण्यात आली होती त्यासाठी 112 ची ड्राय रन केली गली तसेच अपघात ग्रस्तांसाठी तातडीने वैद्यकीय मदत मिळावी यासाठी महामार्ग मृत्युंजय दूत योजना सुरू करण्यात आली.
राज्यातील अ व ब गटातील अधिकार्यांना दिलासा देणारा निर्णय राज्यातील महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे या गटातील अधिकार्यांच्या पात्र सदस्यांना देखील अनुकंपा तत्त्वावर राज्य शासकीय सेवेत नियुक्ती दिली जाणार आहे असा महत्वपूर्ण निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे आतापर्यंत शासकीय सेवेतील क व ड कर्मचार्यांच्या कुटुंबीयांनाच हा निर्णय लागू होता परंतु महाविकास आघाडी सरकारने आता अनुकंपा धोरण सर्व अधिकार्यांना लागू केले आहे. कोरोना काळामध्ये शिवभोजन योजना राबवली.
कोरोना कालावधीमध्ये राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने गुगल सोबत भागीदारी केली शाळांसाठी गूगल क्लासरूम प्रकल्पाची सुरुवात केली असे पाऊल टाकणारे महाराष्ट्र राज्य हे देशातील पहिले राज्य ठरले. कोरोनावर प्रभावीपणे नियंत्रण मिळविण्यासाठी तसेच राज्यात प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचून आरोग्य शिक्षण देण्यासाठी राज्यभरात माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम राबविली. निसर्ग वादळाचा सर्वाधिक फटका कोकण किनारपट्टीला बसला यामुळे रायगड, सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्याला भरीव मदत निधी दिला. असे अनेक विविध प्रश्न महा विकास आघाडी सरकारने मार्गी लावले आहेत ढाके साहेब आपण जर वस्तुस्थिती बघितली तर आपण ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या जोरावर महापालिकेत प्रवेश केला, ते भाजपमध्ये असताना भाजप वासियांनी त्यांना किती अडचणीत आणले, त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला वास्तविक पाहता आपण पण त्यांच्यावर निष्ठाठेवून पक्ष सोडायला हवा होता, याचे आपण आत्मपरीक्षण केले पाहिजे, असेही बाबर यांनी शेवटी म्हटले आहे.










Leave a Reply