पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाग्रस्त रुग्णवाढल्याने मृत्यूची संख्या वाढली – आयुक्त हर्डीकर

 पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाग्रस्त रुग्णवाढल्याने मृत्यूची संख्या वाढली – आयुक्त हर्डीकर

Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहरातील मृत्यूदर 1.6 टक्क्यांच्या आसपास आहे. कोरोनाची लागण जास्त लोकांना झाली आहे. त्यामुळे रुग्णसंख्या वाढली असल्याचे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले. कोरोनाची लागण झालेली आहे. पण ‘डिटेक्ट’ झाले नाही असे एक हजारच्या आसपास रुग्ण अपेक्षित धरले. तर, मृत्यूदर एक टक्क्यांपेक्षाही कमीच आहे, असेही त्यांनी सांगितले.

आयुक्त हर्डीकर म्हणाले, जुलै महिन्यात मृत्यूची संख्या वाढली. ऑगस्टच्या पहिल्या 11 दिवसात 157 जणांचे मृत्यू झाले आहेत. दररोज 12 ते 15 जणांचा मृत्यू होत आहे. तर, दिवसाला नवीन एक हजार रुग्ण पॉझिटीव्ह येत आहेत. त्यामुळे मृत्यूदर 1.5 टक्क्यांच्या आसपास आहे.

दरम्यान, शहरातील कोरोनाचा पहिला बळी 12 एप्रिल रोजी गेला होता. थेरगाव भागातील एका पुरुषाचा मृत्यू झाला होता. मे अखेरपर्यंत केवळ 8 जणांचा मृत्यू झाला होता. जूनअखेर पर्यंत शहरातील कोरोना बळींची संख्या 77 झाली होती. जुलै महिन्यात वाढत्या रुग्णसंख्येबरोबरच मृत्यूची संख्याही प्रचंड वाढली आहे. जुलै महिन्यात तब्बल 258 रुग्णांचा मृत्यू झाला होता. तर, एकूण मृत्यू संख्या 335 वर पोहोचली होती. कालपर्यंत शहरातील 510 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

ऑगस्टच्या पहिल्या दिवसांपासून रुग्णवाढीचा आलेख उंचावलेलाच राहिला. त्यासोबतच मृत्यूच्या संख्येतही प्रचंड वाढ झाली आहे. 1 ते 11 ऑगस्ट केवळ 11 दिवसात तब्बल 175 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मृत्यूचे वाढते प्रमाण पाहता चिंता व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *