खडकीत सहा दिवस दुकाने उघडी ठेवण्यास कँटोन्मेंट बोर्डाची मान्यता
Pckhabar- व्यापारी संघटना व शिवसेनेच्या वतिने दुकाने उघडी ठेवण्या संदर्भात केलेल्या मागणीस कँन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाने सकारात्मक असा प्रतिसाद देत आठवड्यातील सहा दिवस बोर्ड हद्दीतील दुकाने सुरु ठेवण्याचा निर्णय मंगळवारी घेतला आहे.
परिसरात वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमिवर कँटोन्मेंट प्रशासनाने राज्यशासन व जिल्हाधिकारी यांच्या निदेशानुसार कँटोन्मेंट हद्दीतील बाजारपेठ दुकाने ही आठवड्यातील चार दिवस गुरुवार ते रविवार सुरु ठेवण्याचा तर तिन दिवस सोमवार ते बुधवार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र सदर निर्णयावर येथिल व्यापारीवर्ग प्रचंड नाराज होते. मागील पाच महिन्यापासुन व्यसायिक व व्यापारी लॉकडाऊनची झळ सोसत आहेत. प्रशासनास सर्वोतपरी सहकार्याची भुमिका व्यापार्याने घेतली. मागील पाच महिन्यात व्यापार्याचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. प्रशासनाने पुणे व पिंपरी-चिंचवड शहराप्रमाणे दुकाने सुरु ठेवण्याबाबत विचार करावा.
सध्या सणासुदीचे दिवस आहेत, त्या पार्श्वभुमीवर प्रशासनाने खडकीतील दुकाने सुरु ठेवण्याबाबत निर्णय घ्यावा, अशी एकमुखी मागणी व्यापारी वर्गाच्या वतिने तसेच शिवसेना खडकी विभागाच्या वतिने विभाग प्रमुख रविंद्र सोनवणे व राजेश काकडे यांनी कँटोन्मेंट बोर्ड अध्यक्ष ब्रि.एम.जे.कुमार व सीईओ. प्रमोदकुमार सिंग याच्याकडे सोमवारी करण्यात आली. शिवसेनेच्या वतीने सदर मागणीची प्रत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ही पाठविण्या आली होती.
व्यापारी संघटना तसेच शिवसेनेने केलेल्या मागणीची दखल घेत अखेर कँटोन्मेंट बोर्ड प्रशासनाने हद्दीतील दुकाने बाजारपेठ आठवड्यातील सहा दिवस सुरु ठेवण्यास मान्यता दिली, अशी माहिती प्रशासनाच्या वतिने आज देण्यात आली. सोमवारी दुकाने बाजारपेठ बंद राहतील, सीईओ.प्रमोदकुमार सिंग यांनी बोर्डाचे अध्यक्ष ब्रि.एम.जे.कुमार यांच्याकडे दुकाने सुरु ठेवण्याबाबतचा व्यापारी वर्गाने केलेल्या मागणीचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. त्यास अध्यक्ष ब्रि. कुमार यांनी मान्यता दिली. त्यानुसार परिसरातील बाजारपेठ व दुकाने ही मंगळवार ते रविवार सकाळी 9 ते सांयकाळी 7 पर्यंत सुरु राहतील. भाजी मंडई फळ विक्रेते यांना सकाळी 8 ते सायंकाळी 6 पर्यंत व्यवसायास परवानगी. ठोकभाजी मंडई पहाटे 4 ते सकाळी 8 पर्यत हाँटेल व रेस्टाँरेंट फक्त पार्सल सेवा आठवड्यातील सर्व दिवस सकाळी 9 ते सायंकाळी 7 पर्यत.
परिसरातील दुकाने उघडी ठेवण्याबाबत कँटोन्मेंट प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाचे व्यापारी संघटना व शिवसेनेने स्वागत करीत परिसरातील बंद करण्यात आलेले प्रमुख रस्ते पुर्ववत सुरु करावे ज्यामुळे ग्राहक वर्गांना बाजारपेठेत प्रवेश करणे सुलभ होईल अशी मागणी पुढे करण्यात आली.
खडकीत सहा दिवस दुकाने उघडी ठेवण्यास कँटोन्मेंट बोर्डाची मान्यता










Leave a Reply