Chinchwad News : मानसिक ताण दूर होण्यास व्यायामाची मदत : डॉ. दीपक शहा

Pckhabar- प्रत्येकाचे आरोग्य हीच खरी संपत्ती असून नियमित व्यायाम केल्यामुळे मानसिक ताण दूर होतो. शरीर स्वस्थ आणि तंदुरूस्त असेल तर, सुखी जीवन जगता येते, असे प्रतिपादन प्रतिभा महाविद्यालयाचे सचिव डॉ. दीपक शहा यांनी केले.

चिंचवडमधील कमला एज्युकेशन सोसायटीच्या प्रतिभा महाविद्यालयात विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांसाठी उत्तम दर्जाची सर्व साधने संस्थेने उपलब्ध करून प्रशस्त व्यायाम शाळेचे उद्घाटन सोहळा संस्थेच्या 14 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून शारीरिक शिक्षण विभागाचे प्रमुख प्रा. पांडुरंग इंगळे, प्रा. शबाना शेख, संदीप शहा यांच्याहस्ते फीत कापून करण्यात आले. तर, डॉ. दीपक शहा यांच्याहस्ते मारुतीच्या प्रतिमेसमोर श्रीफळ वाढवण्यात आले. त्यावेळी कमला शिक्षण संस्थेच्या संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा मार्गदर्शन करताना बोलत होते.

यावेळी वरीष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाबासाहेब सांगळे, उपप्रचार्या डॉ. क्षितिजा गांधी, पी.आय.बी.एम.चे संचालक डॉ. सचिन बोरगावे, शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. पौर्णिमा कदम, कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्रचार्या डॉ. वनिता कुर्हाडे, संस्थेचे प्रशासकीय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरिया, क्रिडा शिक्षक दर्शन गंधे उपस्थित होते. तसेच कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयाचे शारीरिक विभागाचे सर्व शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
डॉ. दीपक शहा पुढे म्हणाले, प्रतिभा कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्रचार्या डॉ. वनिता कुर्हाडे यांच्या व आदींच्या प्रोत्साहनाने आणि शारीरिक विभागाच्या विशेष पुढाकाराने संस्थेतील शिक्षण घेणारे विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचार्याच्या निरोगी आरोग्यासाठी मोफत सुरू करण्यात येत आहे. कोरोना प्रादुर्भाव काळात लॉकडाऊनमुळे ऑनलाईन शिक्षण सुरू होते. महाविद्यालये बंद होती, अनेकांना मानसिक त्रास, नैराश्य, चिडचिडेपणा, वजन वाढणे आदी समस्यांना सामोरे जावे लागले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शारिरीक विभाग प्रमुख प्रा. शबाना शेख यांनी केले.











Leave a Reply