Pimpri News : कोरोना काळातील योगदानाबद्दल डॉ. राजेंद्र वाबळे यांचा’मानवधिकार पुरस्कारा’ने सन्मान
जागतिक मानवधिकार दिनानिमित्त 11 व्यक्ती, तीन संस्थांचा गौरव

Pckhabar- जागतिक मानवधिकार दिनानिमित्त मानवी हक्क संरक्षण आणि जाग्रतीच्या वतीने कोरोना काळातील योगदानाबद्दल वायसीएम रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांचा
‘मानवधिकार पुरस्कारा’ने सन्मान करण्यात आला. तसेच राज्यस्तरीय राज्य भरातुन विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणार्या व्यक्ती आणि संस्थांना ’मानवधिकार’पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. राज्यभरातून एकुण 11 व्यक्तीना व संस्थेतील तीन उत्कृष्ट जिल्हा कमिटींना गौरविण्यात आले.
राज्यातील सात पुरस्कारापैकी पिंपरी चिंचवड मधून पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांचा कोरोनाकाळातील योगदानाबद्दल न्यायमूर्ती प्रताप सावंत, पुणे जिल्हा सिव्हिल सर्जन डॉ. ए.बी.नांदुरकर, शहराध्यक्ष आण्णा जोगदंड यांच्या हस्ते ‘मानवधिकार पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.
डॉ. राजेश वाबळे यांनी जिवाची परवा न करता कोरोना काळात अहोरात्र काम केले. वायसीएम रूग्णालयातून हजारो रूग्ण कोरोनावर यशस्वी मात करून सुखरूप घरी गेले आहेत. वायसीएममधील कोरोनाचा मृत्यू दर कमी ठेवण्यात डॉ. वाबळे यांनी यश मिळवले. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन ‘मानवधिकार पुरस्कारा’ने त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.

पिंपरी-चिंचवडच्या कमिटीला सलग दुसर्यांदा प्रथम क्रमांकाचा मानवधिकार पुरस्कार विधी प्राधिकरणाचे न्यायमूर्ती प्रताप सावंत व पुणे जिल्हा सिव्हिल सर्जन डॉ. ए.बी.नांदुरकर यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. ठाणे कमीटी व सोलापूर जिल्ह्यातील बार्शी कमिटीला ही पुरस्काराने गौरविण्यात आले.
ज्येष्ठ प्रबोधनकार शारदाताई मुडे यांनी पंधरा हजार एकपात्री समाजप्रबोधनावर आईच्या काळजातुन,स्त्री-भ्रुण हत्या, व्हय म्या सावित्री, पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर, म्या सायबाची रमा, रयत माऊली, याबरोबरच भजन, भारूडेमधून समाज प्रभोधन केले त्यांना ही मानवधिकार पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
यावेळी शहराध्यक्ष आण्णा जोगदंड म्हणाले की हा पुरस्कार माझा नसून सर्वांनी केलेल्या सांघिक सामाजिक कामाची पावती आहे.
पुरस्कार स्विकारातांना शहराध्यक्ष आण्णा जोगदंड, महिला अध्याक्षा मीना करंजावणे, पश्चिम महाराष्ट्र महीला अध्यक्षा संगिता जोगदंड , युवक अध्यक्ष अतिश गायकवाड, गजानन धाराशिवकर, रवी भेंनकी, शरद शेजवळ, पल्लवी भेंनकी, अतिश जगदाळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी संस्था अध्यक्ष विकास कुचेकर, पुणे जिल्हा प्राधिकरणाचे न्यायमूर्ती प्रताप सावंत, पुणे जिल्हा रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन डॉ ए.बी.नांदुरकर, समाजकारण साहाय्यक आयुक्त कैलास आढे , कायदेतज्ञ असिम सरोदे, बाल हक्क कार्यकर्त्यां डॉ.यामिनी आडबे, सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे व्यवस्थापण समिती सदस्य डॉ सुधाकर जाधव उपस्थित होते.










Leave a Reply